पवई: गणेश विसर्जनादरम्यान तलावात झाले मगरीचे दर्शन, गणेशभक्तांची उडाली तारांबळ

गणेश विसर्जनावेळी मगर तलावाजवळ येताच लोकांची अक्षरश: तारांबळ उडाली.

Crocodile (Photo Credits: Unsplash/Representational Image)

Ganeshotsav 2019: गणेशभक्तांनो सावधान विसर्जनासाठी पवई तलावात जाणार असाल तर या गोष्टीची खात्री करुन घ्या. कारण गणेश विसर्जनासाठी पवई (Powai) तलावात गेलेल्या भक्तांना अचानक मगरीचे (Crocodile) दर्शन झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. गणेश विसर्जनावेळी मगर तलावाजवळ येताच लोकांची अक्षरश: तारांबळ उडाली. सुदैवाने त्यावेळी गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) तलावात उतरले नसल्याने जीवितहानी कोणतीही झाली नाही. सर्वात मोक्याची ठिकाणी असलेल्या पवई तलावात अशी अचानक मगर दिसल्याने गणेशभक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही विसर्जनासाठी मुंबईच्या पवई तलावावर गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. पवई तलावात मगर आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे, मात्र या मगरीचे दर्शन विसर्जनासाठी गेलेल्या गणेश भक्तांना पाहायला मिळाल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. सुदैवाने त्यावेळी तलावात कोणीही उतरले नसल्याने काही विपरित घडले नाही. हेही वाचा- गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूकीदरम्यान 'या' गोष्टींबाबत सुरक्षा नक्की बाळगा

दरवर्षी पालिकेकडून या विसर्जन स्थळावर मगर येऊ नयेत यासाठी उपाययोजना केली जाते. परंतु या वर्षी त्या उपायोजना केल्यात का असा प्रश्न आता समोर येतो आहे. गणेशभक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे. हेही वाचा- Ganeshotsav 2019: लातूर शहरात यंदा गणपती विसर्जन नाही; भीषण पाणीटंचाईमुळे मूर्ती दान करण्याचे अवाहन

ऐन विसर्जनाच्या वेळी अशी घटना घडल्याने गणेश भक्तांमध्ये आणि तसेच सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच 11 दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनासाठी जाणा-या गणेश भक्तांमध्ये घबराट पसरली असून विसर्जनातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.