COVID 19 In Maharashtra: South Africa मधून Dombivali मध्ये परतलेली व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह; KDMC कडून आयसोलेशन सेंटर मध्ये दाखल

पण ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊन मधून डोंबिवली मध्ये 24 नोव्हेंबरला आली आहे.

(Photo Credit - Pixabay)

मुंबई सह भारतामध्ये कोरोना संकट नियंत्रणात आलेले असताना आता Omicron या वायरसने जगाचं टेंशन वाढवलं आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली (Dombivali) मध्ये साऊथ आफ्रिकेतून (South Africa) आलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह (COVID 19 Positive) आढळली आहे. केडीएमसी च्या अधिकार्‍यांनी काल (28 नोव्हेंबर) दिवशी दिलेल्या माहितीमध्ये ही बाब सांगितली आहे. सध्या ओमिक्रॉन बद्दल जागतिक आरोग्य संघटने (WHO) देखील चिंता व्यक्त केल्यानंतर आता महाराष्ट्रातही आंतरराष्ट्रीय प्रवाशांबद्दल माहिती ठेवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

अद्याप साऊथ आफ्रिकेतून आलेल्या या व्यक्तीच्या कोरोना रिपोर्ट मध्ये तो ओमिक्रॉन वायरसने ग्रस्त आहे की नाही याची माहिती मिळू शकलेली नाही. पण ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊन मधून डोंबिवली मध्ये 24 नोव्हेंबरला आली आहे. ओमिक्रॉन वायरस पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळला असल्याने आणि तेथे झपाट्याने रूग्णसंख्या वाढत असल्याने अनेक देशांनी साऊथ आफ्रिकेच्या फ्लाईट्सवर बंदी घातली आहे. नक्की वाचा: Guidelines for International Arrivals: सरकारने जारी केल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या मार्गदर्शक सुचना; सादर करावा लागेल 14 दिवसांच्या प्रवासाचा तपशील .

केडीएमसीच्या मेडिकल ऑफिसर, डॉ. प्रतिभा पणपाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती डोंबिवली मध्ये परतल्यानंतर अद्याप कोणाच्याही संपर्कात आलेली नाही. भारतात आल्यानंतर त्याने कोविड चाचणी करून घेतली आणि ती पॉझिटीव्ह आली आहे.

सध्या या व्यक्तीला केडीएमसी ने Art Gallery isolation center मध्ये ठेवले आहे. सध्या यंत्रणा सज्ज असून नव्या व्हेरिएंट सोबत लढण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याचंही डॉ. प्रतिभा यांनी म्हटलं आहे.