COVID-19 Hospital Bed Availability in Mumbai, Thane and Navi Mumbai: मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहरातील कोविड 19 रुग्णालयातील बेड्स उपलब्धता पाहण्यासाठी हा डॅशबोर्ड पाहा, जाणून घ्या शहरातील आयसीयू आणि एकूण खांटांबाबत

या डॅशबोर्डवर प्रामुख्याने मुंबई , ठाणे आणि नवी मुंबई या शहरांमधील रुग्णालयांमध्ये असलेल्या बेड्स , आयसीयू (ICU) आदींची क्षमता आणि स्थिती, उपलब्धतात जाणून घेता येणार आहे.

COVID-19 Hospital (Photo Credits: PTI)

राज्यातील कोरोना (Coronavirus) रुग्णांची वाढती संख्या पाहता कोविड रुग्णालयांमध्ये बोड्स आणि आयसीयू कक्ष मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची मागणी होत आहे. त्यातच काही शहरांतून कोविड रुग्णांसाठी बेड्सची संख्या अपूरी पडत असल्याचे वृत्त येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णालयांमधी बेड्स, आयसीयू याबाबंत माहिती देण्यासाठी सरकारने एक डॅशबोर्ड बनवला आहे. या डॅशबोर्डवर प्रामुख्याने मुंबई (COVID-19 Hospitals in Navi Mumbai), ठाणे (COVID-19 Hospitals in Thane), आणि नवी मुंबई (COVID-19 Hospitals in Navi Mumbai) या शहरांमधील रुग्णालयांमध्ये असलेल्या बेड्स (,COVID-19 Hospital Bed Availability), आयसीयू (ICU) आदींची क्षमता आणि स्थिती, उपलब्धतात जाणून घेता येणार आहे. यात खासगी आणि सरकारी अशा सर्व रुग्णालयांचा समावेश आहे. या तिन्ही शहरांतील बेड्सबाबत माहिती अनुक्रमे मुंबई महापालिका (BMC), ठाणे महापालिका (TMC) आणि नवी मुंबई महापालिका (NMMC) आदींच्या संकेतस्थळांवर पाहायला मिळू शकतो.

ठाणे शहरातील कोविड रुग्णसंख्या, कोविड 19 रुग्णालयं, रुग्णालयात उपलब्ध असलेले बेड्स, आयसीयू आदी जाणून घेण्यासाठी आपण इथे क्लिक करु शकता. या डॅशबोर्डवर आपल्याला कोरोना रुग्णांवर केले जाणारे उपचार, चाचण्या आणि इतरही काही माहिती मिळू शकेल. तसेच, कोरोना रुग्णाला तातडीने बेड मिळावा यासाठीही ही माहिती फायद्याची ठरु शकणार आहे. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray Live Update: पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय पण आज त्याबद्दल जाहीर करत नाही- उद्धव ठाकरे)

मुंबई महापालिका हद्दीत कोरोना रुग्णासाठी बेड, कोविड हॉस्पिटल आदींबाबत जाणून घेण्यासाठी stopcoronavirus.mcgm.gov.in संकेतस्थळाला भेट द्या.

नवी मुंबई शहर परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी nmmchealthfacilities.com या संकेतस्थळाला भेट द्या. या ठिकाणी तुम्हाल नेरुळ, वसई, कोपरखैरने, सीबीडी बेलापूर, सानपाडा, ऐरोली आदी ठिकाणची माहिती मिळू शकेल.

ठाणे शहरातील नागरिकांना कोविड रुग्णांसाठी बेड्सची माहिती देण्यासाठी थेट डॅशबोर्ड ओपन करुन देण्यात आला आहे. त्यासाठी इथे क्लिक करा.

राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्यामुळे राज्य सरकारने अवाहन केले आहे की, नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. जबाबदारीने राहायला हवे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील जनतेला नुकतेच संबोधित केले. या वेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, राज्य सरकार लॉकडाऊन लागू करु इच्छित नाही. मास्क लावा आणि जबाबदारीने वर्तन करा. असे केल्या लॉकडाऊन लावण्याची गरज भासणार नाही. परंतू, खबरादारी न घेता नागरिकांनी सूचनांचे पालनही नाही केले तर मात्र लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय राहणार नाही.