Coronavirus Updates: मुंबई येथील INS Angre या नौदल तळावरील 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
मुंबईतील INS Angre या नौदल तळावरील 20 कर्मचार्यांना कोरोना ची लागण झाल्याचे समजुन येत आहे.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) मोठा फटका बसलेल्या मुंबई (Mumbai) शहरात आता आणखीन 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजून येतेय. हे 20 जण मुंबईतील INS Angre या नौदल तळावरील कर्मचारी आहेत. 7 एप्रिल रोजी येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समजून आले होते, त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये अन्य 20 कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समजून येत आहे. या कर्मचार्यानावर सध्या उपचार सुरु असून, अन्य निगेटिव्ह रुग्णांना सुद्धा खबरदारी साठी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. (Coronavirus: महाराष्ट्रात आतापर्यंत 23 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह)
प्राप्त माहितीनुसार, या तळावर कोरोना बाधित रुग्ण आढळताच संपुर्ण परिसर कंंटेनमेंट झोन म्हणुन घोषित करण्यात आला आहे. तसेच INS Angre तळ सुद्धा लॉकडाउन करण्यात आले आहे. नौदलाच्या माहितीनुसार जहाज किंवा सबमरीन मध्ये कर्मचार्यांंना कोरोनाची बाधा झालेली नाही.
ANI ट्विट
मुंबई शहर हे देशातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट बनले आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल एकूण 77 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील कोरोना बाधीतांची संख्या 2 हजार 120 वर पोहचली आहे. यामध्ये दिलासादायक माहिती अशी की, याआधी होणाऱ्या कोरोनाच्या वाढीपेक्षा आता रुग्ण संख्येत 40 टक्क्याने घट होत असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे संपूर्ण राज्यातील रुग्णांची आकडेवारी पाहता, सद्य घडीला महाराष्ट्रात कोरोना ची लागण झालेल्यांची संख्या 3 हजार 205 वर पोहचली आहे. यात 194 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, देशभरात आतापर्यंत एकूण 13 हजार 835 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामधील 11,616 जणांवर अजूनही उपचार सुरु आहेत ,452 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 767 रुग्णांना कोरोनाच्या जाळ्यातून मुक्त करण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.