Coronavirus: नागपूर येथे कोरोना व्हायरसमुळे 68 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती
याच पार्श्वभुमीवर नागपूर (Nagpur) येथे एका 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सरकारने लॉकडाउनचे आदेश येत्या 14 एप्रिल पर्यंत लागू केले आहेत. या लॉकडाउनच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडण्यास परवानगी आहे. तरीही काही नागरिक विनाकारण गर्दी करत सकाळी भाजी खरेदी करताना दिसून येत आहे. ऐवढेच नाही तर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात सु्द्धा पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. राज्य सरकार नागरिकांना वारंवार घरात थांबवण्याचे आवाहन करत आहे तरीही लोक ऐकण्यास तयार नसल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. याच पार्श्वभुमीवर नागपूर (Nagpur) येथे एका 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूर जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी अधिक माहिती देत असे सांगितले आहे की, एका 68 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा 5 एप्रिल रोजी मृत्यू झाला. या व्यक्तीचे नमूने तपासणीसाठी दिले असता त्याची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे रिपोर्ट मधून समोर आले आहे. कोरोनाची लागण खासकरुन ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमकुवत असते त्यांना लगेच होते असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वृद्धांनी कोरोनाच्या काळात स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तर काही दिवसांपूर्वी डब्लूएचओ यांनी कोरोना व्हायरस हवेतून पसरत नाही. मात्र तो शिंकण्यातून, खोकण्यातून पसरत असल्याची माहिती देण्यात आली आहे.(Covid-19: नालासोपारा येथे कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे 38 वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू)
दरम्यान, महाराष्ट्रावरील कोरोना व्हायरसचे संकट दूर करण्यासाठी प्रत्येक स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. तसेच कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी बडे उद्योगपती ते सामान्य व्यक्ती पर्यत लोक आपल्या परीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक मदत करत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे नवे 120 रुग्ण आढळून आल्याने आकडा 686 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.