Coronavirus Outbreak in Maharashtra: पुणे येथील ससून रुग्णालयात 2 कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा मृत्यू
पुण्यातील कोरोना व्हायरस बाधित महिलेचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
देशासह महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुणे (Pune) येथे आणखी दोन बळी घेतले आहेत. पुण्यातील कोरोना व्हायरस बाधित 52 वर्षीय रुग्णाचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यापूर्वी 3 एप्रिल रोजी ससून रुग्णालयात कोरोना पॉझिटीव्ह 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या 52 वर्षीय रुग्णाला मधुमेहाचा आजार होता. तर 60 वर्षीय महिलेची पहिल्यांदा केलेली कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली होती. त्यानंतर पुन्हा चाचणी केल्यानंतर ती महिला कोरोना बाधित असल्याचे समोर आले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासात पुण्यातील हा दुसरा मृत्यू आहे. या मूत्यूसह पुण्यातील कोरोना व्हायरस बाधित बळींची संख्या 4 झाली आहे. कोरोनाग्रस्तांची सातत्याने वाढणारी संख्या यामुळे सरकार वैद्यकीय सुविधांकडे विशेष लक्ष देत आहे. राज्यातील 30 रुग्णालये कोरोनाग्रस्तांसाठी देण्यात आली आहेत. (महाराष्ट्रातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना ग्रस्तांच्या उपचारासाठी घोषित, येथे पाहा यादी)
कोरोना व्हायरसची संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 26 नव्या रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 661 वर पोहचला आहे. काल (4 एप्रिल) शनिवार 52 नवे रुग्ण समोर आले होते. तर देशातील कोरोना बाधितांचा आकडा 3374 वर पोहचला आहे.
ANI Tweet:
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाकडून अधिकाधिक लोकांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. तसंच कोरोनाला आळा घालण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे.