Coronavirus Maharashtra Latest Updates: मुंबई, पुण्यासह राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या वाढली; राज्यात 1,30,547 जणांवर उपचार सुरु
त्यापैकी 1,30,547 जणांवर प्रत्यक्ष उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 21,44,743 जण उपाचर घेऊन बरे झाले आहेत. तर 52,909 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई (Mumbai), पुणे (Pune) या प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येते आहे की काय? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. एकट्या मुंबई शहरात गेल्या 24 तासांत 1 हजार 922 कोरोना रुग्ण आढळले. तर मुंबई नंतर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या दिवसभरात 1 हजार 925 नवे रुग्ण आढळून आले आहेत. पुणे, मुंबई यांच्यासह राज्यातील विविध जिल्हे असा सर्वांचा मिळून राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1,30,547 इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर ही माहिती आहे.
मुंबईत चिंता वाढवणारी स्थिती
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात गेल्या चोवीस तासात 1,922 कोरोना रुग्ण नोंदवले गेले. तर उपचार घेऊन बरे झालेल्या आणि घरी परतलेल्यांची (डिस्चार्ज) संख्या 1,236 इतकी आहे.मुंबईत आज कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झाला. या चौघांनाही दीर्घकाली आजार होते असे सांगितले जात आहे. मृतांमध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. आज घडीला मुंबईत 15,263 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
पुणेही चिंतेने ग्रासले
मुंबई पाठोपाठ पुणे शहरातही कोरोना संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पुण्यात गेल्या 24 तासात 3,574 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर 1,577 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 12 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुणे महापालिका आरोग्य विभागाने दिली आहे. पुण्याच सध्या 24,204 कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत 4,10,347 जणांना डिस्चार्ज मिलाले आहेत. तर 9,440 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरना संक्रमितांची एकूण संख्या 23,29,464 इतकी आहे. त्यापैकी 1,30,547 जणांवर प्रत्यक्ष उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 21,44,743 जण उपाचर घेऊन बरे झाले आहेत. तर 52,909 जणांचा मृत्यू झाला आहे.