महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 283 रुग्ण आढळून आल्याने आकडा 4483 वर पोहचला- आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्रात 283 आणखी नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 4483 वर पोहचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालल्याने सरकारकडून लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम ठेवण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही नागरिक सकाळच्या वेळेस काही ना काही कारण सांगत घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच भाजीपाला खरेदी करताना नागरिकांकडून सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू शकतो असे असले तरीही नागरिक काही ठिकाणी बेजबाबदारपणे वागत आहेत. तर महाराष्ट्रात (Maharashtra) 283 आणखी नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 4483 वर पोहचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

राजेश टोपे यांनी राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची आकडेवारी जाहीर केली असून ती 4 हजारांच्या पार गेली आहे. तर नव्या 283 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबईतील 187 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या नॉन-हॉटस्पॉट ठिकाणी आजपासून लॉकडाउनचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. तसेच उद्योगधंदे सुद्धा काही प्रमाणात सुरु करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे.(Coronavirus: मुंबई BMC मधील 2 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कक्ष सील)

दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसरात्र कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तर देशभरात कोरोनाचे एकूण रुग्ण 17656 आढळून आले असून 559 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. तर देशभरात येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच जाहीर केला आहे.