मुंबई मध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला; 10 दिवसात एकूण रुग्ण वाढीचा आलेख स्थिर रेषेत, वाचा सविस्तर

भारतात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असणारे शहर म्हणजेच मुंबईत (Coronavirus In Mumbai) मागील 10 दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढीचा आलेख स्थिरावला आहे

Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असणारे शहर म्हणजेच मुंबईत (Coronavirus In Mumbai) मागील 10 दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढीचा आलेख स्थिरावला आहे. मुंबईतील रोजच्या एकूण कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत होणारी वाढ ही एकाच सलग रेषेत होता असून फार मोठ्या फरकाने रुग्ण वाढत नाहीयेत. याबाबत राज्य आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १५ जून पासून फार मोठी वाढ दिसून आलेली नाही. मागील 10 दिवसांचे आकडे पाहता 1,287, 1,163, 1,338, 1,554, 1,487, 893, 1,226, 1,287, 1,402, 1,297 अशी रुग्ण संख्या वाढत आहे. या दहा दिवसांची सरासरी पाहिल्यास प्रति दिन 1,293 रुग्ण वाढ होतेय असे समोर येते. Coronavirus Update In India: एका दिवसात 24,248 नवे कोरोना रुग्ण; देशातील COVID-19 रुग्णांची संख्या 6,97,413 वर, 19,693 जणांचा मृत्यु

COVID 19 टास्क फोर्स मधील डॉ. शशांक जोशी यांच्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यामागे कमी चाचण्या हे कारण नाही, उलट शहरात एप्रिल आणि मे च्या तुलनेत जून आणि जुलै मध्ये अधिक कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. आकडेवारी पाहायला गेल्यास, जून 25 ते 5 जुलै दरम्यान, 5025 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात मुंबई, पुणे, रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण, जाणून घ्या आजची जिल्हानिहाय आकडेवारी

दुसरीकडे, शहरातील कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही घट झालेली दिसून येत आहे, जून 25 पर्यंत शहरात एकूण 27,659 कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण होते तर आता रविवारी 5 जुलै ला हीच ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 23,732 इतकी झाली आहे.