Coronavirus In Maharashtra: मुंबई मध्ये 65 वर्षीय कोरोनाबाधित वृद्ध महिलेचं निधन, मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

ही वृद्ध महिला कोरोना व्हायरस बाधित असली तरीही तिचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे जीवघेण्या होत चाललेल्या कोव्हिड 19 या आजारामुळेच झाला आहे की नाही याची तपसणी डॉक्टरांकडून केली जात आहे.

COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

जगभरासह महाराष्ट्रात आता कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. दरम्यान 'वॉर व्हर्सेस व्हायरस' या युद्धामध्ये मुंबईत आज एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. ही वृद्ध महिला कोरोना व्हायरस बाधित असली तरीही तिचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे जीवघेण्या होत चाललेल्या कोव्हिड 19 या आजारामुळेच झाला आहे की नाही याची तपसणी डॉक्टरांकडून केली जात आहे. लवकरच त्यांच्या मृत्यूचे कारणही स्पष्ट केले जाईल. जगभरात कोरोना व्हायरस रोगप्रतिकारक शक्ती कमी असणार्‍यांसाठी जास्त धोकादायक आहे. त्यामुळे 60 वर्षांवरील आणि लहान मुलांना जपण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर, हृद्य विकार अशा आजाराचा पूर्व इतिहास असणार्‍यांना त्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. Coronavirus in Maharashtra: मुंबई, ठाणे येथे कोरोनाचे दोन नवे रुग्ण; राज्यात कोरोना व्हायरसग्रस्तांचा आकडा 124

महाराष्ट्रात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 124 वर पोहचला आहे. मुंबई शहरामध्ये सर्वाधिक कोरोना बाधित आहेत. त्यामुळे नागरिकांना वारंवारं अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहेत. तर देशभरात कोरोनाचे 649 रूग्ण असून त्यापैकी 593 जणांवर उपचार सुरू असून 42 जण कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले आहेत तर 13 जणांचा बळी गेला आहे. Coronavirus Outbreak: भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढून 649 वर पोहचला.

ANI Tweet  

महाराष्ट्रात काल  गुढीपाडव्यदिवशी  राज्यात पुणे शहरामध्ये आढळलेले पहिले कोरोना बाधित दांम्पत्य आता कोरोनामुक्त झाल्याने घरी 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहणार आहे. तर आज पिंपरी चिंचवडमधूनही कोरोनामुक्त झालेल्यांची रवानगी आता घरी होऊ शकते. कोरोना  व्हायरस मुळे होणार्‍या कोव्हिड 19 वर अद्याप   ठोस औषध किंवा लस नाही. मात्र संसर्ग टाळायचा असेल तर विलगीकरण हा एकमेव उपाय आता आपल्यासमोर आहे. दरम्यान नगारिकांना हात वारंवार स्वच्छ धुण्याचा, खोकताना, शिंकताना तोंडावर रूमाल धरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

चीनमधून उत्पत्ती झालेला कोरोना व्हायरस आता जगभर पसरला आहे. इटली, स्पेन, अमेरिका मध्ये या व्हायरसने थैमान घातलं आहे. आता भारतामध्ये जनसामान्यांना कोरोना व्हायरस पासून सुरक्षित ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. 25 मार्च पासून पुढील 21 दिवसांसाठी भारत देश लॉक डाऊन असेल.