Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा ताजे अपडेट्स

मुंबई सह ठाणे,पुणे , नाशिक, औरंगाबाद आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कोरोनाचे एकूण किती रुग्ण आहेत? त्यातील किती जणांना आजवर डिस्चार्ज देण्यात आला आहे? किती जणांचा मृत्यू झाला आहे? याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Update: महाराष्ट्रात शुक्रवार 12 जून, रात्री 10 पर्यंत राज्यात एकूण 1,01,141 कोरोना बाधित असल्याचे समजतेय. यापैकी 47796 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, 3717 जणांचा कोरोनाविरुद्ध लढाईत बळी गेला आहे. राज्यात सध्या 49616 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असून यातील गंभीर प्रकृती असलेल्यांचा टक्का फारच कमी आहे. कोरोनाचा महाराष्ट्रातील हॉटस्पॉट असणाऱ्या मुंबईत (Coronavirus In Mumbai) सुद्धा काळ कोरोनाचे नवे 1372 रुग्ण व 90 मृत्यूंची नोंद झाली आहे, यानुसार आता मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा सुद्धा 55,357 वर पोहचला आहे. मुंबई सह ठाणे,पुणे , नाशिक, औरंगाबाद आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कोरोनाचे एकूण किती रुग्ण आहेत याविषयी सविस्तर जाणून घ्या.

मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचे अपडेट्स देताना मुंबईत कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट हा 24 दिवसांवर गेल्याचे म्हंटले होते कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या धारावीत सुद्धा हा रेट 42 दिवसांवर गेल्याची दिलासादायक माहिती ठाकरे यांनी दिली होती. तुमचा जिल्हा कंटेनमेंट झोन, रेड, ग्रीन, ऑरेंज झोन यापैकी नक्की कशात मोडतो हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 55451 2044 25152
ठाणे 16443 413 6645
पुणे 11281 459 6379
औरंगाबाद 2457 125 1360
पालघर 2053 48 688
नाशिक 1785 102 1164
रायगड 1711 58 1038
सोलापुर 1620 120 654
जळगाव 1540 120 634
अकोला 979 40 505
नागपुर 969 12 536
सातारा 717 27 384
कोल्हापुर  681 8 504
रत्नागिरी 391 15 239
धुळे 353 26 168
अमरावती 324 21 236
जालना 250 6 148
हिंगोली 236 1 184
अहमदनगर 226 9 165
सांगली 207 7 109
नांंदेड 204 9 117
यवतमाळ 171 2 117
लातुर 160 6 118
सिंधुदुर्ग 148 0 60
उस्मानाबाद 140 3 96
बुलडाणा 117 3 73
परभणी 81 3 68
बीड 69 2 49
गोंदिया 68 0 68
नंदुरबार 48 4 30
गडचिरोली 48 1 38
भंंडारा 47 0 31
चंद्रपुर  46 0 26
वाशिम 26 2 6
वर्धा 14 1 7
अन्य जिल्हे 80 20 0
एकुण 101141 3717 47796

दरम्यान, राज्यात सध्या 53 शासकीय आणि 42 खाजगी अशा एकूण 95 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 6 लाख 24 हजार 977 नमुन्यांपैकी 1  लाख 1 हजार 141 नमुने पॉझिटिव्ह (16.18  टक्के ) आले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 47.3 टक्के एवढे आहे. तर , राज्यातील मृत्यू दर 3.7 टक्के इतका आहे. याबबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल माहिती दिली होती.