Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे सह तुम्ही राहात असणाऱ्या कोरोनाचे रुग्ण आहेत? पहा आजची कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

महाराष्ट्रात सद्य घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 62228 झाली आहे.आजपर्यंत 2098 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे, तर राज्यभरात 26,997 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई सह पुणे, ठाणे, नागपुर या जिल्हा आणि मनपा क्षेत्रात सुद्धा कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे खालील आकडेवारी नुसार जाणुन घ्या.

Coronavirus In Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात सद्य घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 62228 झाली आहे. काल (29 मे) च्या दिवसभरात राज्यात कोरोनाचे 2682 नवीन रुग्ण आढळुन आले यासह आता राज्यात 33124 कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत 2098 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामध्ये दिलासादायक म्हणजे कालच्या दिवसभरात राज्यात सर्वाधिक म्हणजेच 8381 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, विशेष म्हणजे कोरोनाचा हॉटस्पॉट असणार्‍या मुंबई महापालिका क्षेत्रातील 7358 एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात 26,997 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई सह पुणे, ठाणे, नागपुर या जिल्हा आणि मनपा क्षेत्रात सुद्धा कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे खालील आकडेवारी नुसार जाणुन घ्या.

प्राप्त माहिती नुसार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आतापर्यंत 4 लाख 33 हजार 557 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यातील 62 हजार 228 जण कोरोना पॉझिटव्ह आले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळुन आले आहेत, एकट्या मुंबई शहरातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या आता 36,710 इतकी झाली आहे.महाराष्ट्रासह देशभरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी व ताजे अपडेट्स जाणुन घ्या एका क्लिकवर.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची मनपा/ जिल्हानिहाय आकडेवारी (29 मे 2020 रात्री 8 पर्यंत)

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 36932 1173 16008
ठाणे 8638 172 2729
पुणे 7223 314 3425
औरंगाबाद 1410 65 959
नाशिक 1070 60 818
रायगड 999 29 518
पालघर 913 23 280
सोलापुर 769 62 314
जळगाव 555 69 263
अकोला  537 28 275
नागपुर 511 9 342
सातारा 459 16 145
कोल्हापुर 379 4 87
रत्नागिरी 216 5 88
अमरावती 202 16 117
हिंगोली 143 0 97
धुळे 135 16 70
यवतमाळ 128 0 92
जालना 117 0 32
लातुर 108 3 52
नांदेड 108 6 82
सांगली 104 1 53
अहमदनगर 96 6 52
उस्मानाबाद 64 0 13
गोंंदिया 58 0 3
बुलढाणा 56 3 29
बीड 46 0 5
परभणी 42 1 1
नंदुरबार 33 3 20
गडचिरोली 31 0 5
भंडारा  25 0 1
चंद्रपुर  25 0 9
सिंधुदुर्ग 21 0 7
वर्धा 11 1 0
वाशिम 8 0 6
अन्य जिल्हे 56 13 0
एकुण 62228 2098 26997

दरम्यान, राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) 43.38 इतके आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.37 टक्के इतका आहे. यानुसार तरी कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असुनही परिस्थिती नियंत्रणात आहे असे म्हणता येईल

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now