Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, नाशिक, सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांत किती आहेत COVID-19 चे रुग्ण, जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स

पाहूया मुंबई, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रातील COVID-19 रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी (8 जून ते 9 जून)

Coronavirus In Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांच्या (Coronavirus) संख्येने उच्चांक गाठला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची झपाट्याने वाढत जाणारी संख्या पाहता राज्यातील भयानक परिस्थितीचे चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर ताज्या अपडेट्सनुसार, महाराष्ट्रात (Maharashtra) सद्य घडीला कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 88,529 वर पोहोचली आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काल (8 जून) 2 हजार 553 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 3,169 रुग्ण दगावले असून 40,975 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना विषाणूला महाराष्ट्रातून पळून लावण्यासाठी राज्य सरकारसह सर्व कोविड योद्धा अथक परिश्रम घेत आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 50 हजार 85 वर पोहोचली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.

पाहूया मुंबई, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रातील COVID-19 रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी (8 जून ते 9 जून)

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 50085 1702 22032
ठाणे 13528 336 5081
पुणे 9877 413 5743
औरंगाबाद 2036 100 1231
नाशिक 1592 91 1027
पालघर 1567 41 608
रायगड 1461 55 805
सोलापूर 1419 110 620
जळगाव 1081 115 490
अकोला 834 36 443
नागपूर 761 11 466
कोल्हापूर 648 8 394
सातारा 640 27 309
रत्नागिरी 371 13 182
अमरावती 299 18 173
धुळे 261 25 118
हिंगोली 214 0 164
अहमदनगर 208 9 118
जालना 208 5 130
सांगली 170 4 89
नांदेड 170 8 110
यवतमाळ 163 2 115
लातूर 138 4 102
उस्मानाबाद 125 3 69
सिंधुदुर्ग 113 0 27
बुलढाणा 95 3 54
परभणी 78 3 46
इतर राज्ये 75 19 0
गोंदिया 68 0 64
बीड 56 1 44
गडचिरोली 44 0 31
चंद्रपूर 42 0 25
भंडारा 41 0 24
नंदुरबार 40 4 28
वर्धा 11 1 7
वाशिम 10 2 6
एकूण 88529 3169 40975

सध्या भारतात एकूण 2 लाख 56 हजार 611 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 7 हजार 135 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 24 हजार 303 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्राच्या पाठोपाठ दिल्ली, तामिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगाल मध्ये सुद्धा सर्वाधिक कोरोनाबाधित आढळले आहेत.