IPL Auction 2025 Live

Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, औरंगाबादसह 'या' महत्वाच्या जिल्ह्यांमधील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची आकडेवारी एका क्लिकवर येथे पहा

दिवसागणिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांसह बळींच्या आकड्यात सुद्धा भर पडत आहे. राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 124331 वर पोहचला असून 5893 जणांचा बळी गेला आहे.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता वेगाने वाढत चालल्याचे दिसून येत आहे. दिवसागणिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांसह बळींच्या आकड्यात सुद्धा भर पडत आहे. राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 124331 वर पोहचला असून 5893 जणांचा बळी गेला आहे. त्यापैकी 62773 जणांची प्रकृती सुधारली असून 55651 जणांवर अद्याप उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात येत आहे. कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी राज्य सरकारसह कोविड वॉरियर्स सुद्धा आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत.(दिलासादायक! कोरोना व्हायरस उपचारासाठी मुंबईच्या Glenmark Pharmaceuticals चे FabiFlu औषध बाजारात; DCGI ने दिली परवानगी)

राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, ठाणे या सारख्या ठिकाणी कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा प्रचंड वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तेथे सर्वोतोपरी काळजी घेण्यात येत आहे. तर महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्याच्या विविध जिल्ह्यात कोरोना व्हायरस रुग्णसंख्या, मृतांचा आकडा किती आहे जाणून घेऊया.

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची  जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 64139 3425 32264
ठाणे 22033 675 9284
पुणे 14704 610 8020
औरंगाबाद 3164 176 1713
पालघर 3029 88 1016
नाशिक 2515 137 1422
रायगड 2267 89 1469
जळगाव 2118 179 1075
सोलापूर 2113 185 953
नागपूर 1191 13 781
अकोला 1145 56 708
सातारा 810 34 541
कोल्हापूर 737 8 661
धुळे 479 54 318
रत्नागिरी 474 18 327
अमरावती 405 27 273
जालना 327 12 226
सांगली 274 11 152
नांदेड 271 12 166
अहमदनगर 261 12 204
हिंगोली 243 1 203
यवतमाळ 222 5 156
लातूर 209 13 130
उस्मानाबाद 166 8 125
सिंधुदूर्ग 161 3 114
बुलढाणा 154 5 92
गोंदिया 101 0 69
नंंदूरबार 83 6 36
परभणी 83 4 73
बीड 82 2 56
भंडारदरा 71 0 41
वाशिम 67 3 11
चंद्रपूर 58 0 40
गडचिरोली 52 1 43
वर्धा 14 1 11
अन्य ठिकाणे 109 20 0
एकूण 124331 5893 62773

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे यापूर्वीचे अनेक सण लॉकडाऊनमुळे घरच्या घरी साजरे करावे लागले. तर पुढे येणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक सणांची रेलचेल असते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर येथील राम कदम यांची दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. तर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना खास सूचना केल्या आहेत.