Coronavirus In Maharashtra: 3 दिवसांच्या चिमुकल्यासह आईला चेंबूर येथील साई हॉस्पिटलमध्ये कोरोनाची बाधा

मुंबईतील चेंबुर परिसरात असणार्‍या साई हॉस्पिटलमध्ये प्रसुतीनंतर आई आणि बाळ कोरोनाबाधित असल्याचं समजलं आहे.

Newborn | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

मुंबई मध्ये अवघ्या तीन दिवसाच्या बाळाला कोरोना व्हायरसची धक्कादायक बाब समोर आली आहे. बुधवारी (1  एप्रिल) रात्री तीन दिवसांचा चिमुकला आणि त्याची आई COVID-19 पॉझिटिव्ह असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा प्रकार चेंबुरमधील साई हॉस्पिटलमधील आहे. Indian Express ने दिलेल्या वृत्तानुसार, नवजात बालक आणि मातेला ज्या बेडवर ठेवण्यात आलं होतं त्यावरील रूग्ण कोरोनाबाधित असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा चिमुकला राज्यातील सर्वात लहान कोरोनाबाधित रूग्ण आहे. महाराष्ट्रासअह देशभरत वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा चिंतेची बाब ठरत आहे. Coronavirus Update: महाराष्ट्रात आणखी 3 नवे रुग्ण आढळले; राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 338 वर

कोरोनाबाधित नवजात बालकाचा जन्म 26 मार्च दिवशी झाला. या आठवड्यात मंगळवारी नवजात बालक आणि माता या दोघांनाही कुर्लाच्या भाभा हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या दोघांनाही कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये कोणत्याही paediatrician ने तपासलं नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान 31मार्चला मुंबई महानगर पालिकेने साई हॉस्पिटल बंद केले. हे हॉस्पिटल स्वच्छता आणि निर्जुंतुकीकरणासाठी बंद करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी 8 महिन्याच्या बाळाला जम्मू कश्मिरमध्ये कोरोनाचं निदान झालं होतं. त्याचे आजोबा सौदी अरेबियामधून परतल्याचं सांगण्यात आले होते. दरम्यान काल भारतामध्ये 24 तासात सर्वाधिक म्हणजे 437 नवे रूग्ण आढळले आहेत. देशात सध्या 1647 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 338 रूग्ण आहेत.