केरळच्या 100 डॉक्टर्स, नर्सची टीम महाराष्ट्राला COVID-19 विरूद्धच्या लढाईत मदत करणार; Seven Hills Hospital मध्ये अॅडव्हान्स टीम दाखल!
दरम्यान यापूर्वीच मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटल्समध्ये (Seven Hills Hospital) अॅडव्हान्स टीम दाखल झाली आहे.
भारतामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित संख्या असलेल्या महाराष्ट्र राज्यात आहे. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 65हजारांच्या पार गेली असून मुंबई (Mumbai) शहरात सर्वाधिक रूग्ण आहे. अशा परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्राच्या साथीला केरळची मेडिकल टीम आली आहे. काल (31 मे) केरळचे अर्थमंत्री Thomas Isaac यांनी याबद्दल माहिती आहे. महाराष्ट्राला कोव्हिड 19 विरूद्ध लढण्यास मदत करण्यासाठी 100 डॉक्टर्स आणि नर्सची टीम रवाना झाली आहे. दरम्यान यापूर्वीच मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटल्समध्ये (Seven Hills Hospital) अॅडव्हान्स टीम दाखल झाली आहे. Doctors without borders! असं म्हणत त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
केरळच्या TVM Medical Collegeचे डेप्युटी सुपरिटेंड संतोष कुमार (Santhosh Kumar) यांच्या नेतृत्त्वाखाली 100 जणांची टीम येणार आहे. मुंबईमधील आरोग्य यंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी ही टीम काम करणार आहे. देशात काही महिन्यांपूर्वी केरळ मध्ये देशातील सर्वाधिक रूग्ण होते. मात्र वेळीच केलेल्या उपाययोजना आणि आरोग्य संकटांचा सामना करण्याचा केरळच्या डॉक्टरांचा अनुभव पाहता त्यांना केरळमध्ये कोरोना संकटाला रोखण्यास मदत झाली. आता त्यांचा हाच अनुभव मुंबईमध्ये रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी होणार आहे.
Thomas Isaac यांचे ट्विट!
मुंबईमध्ये पालिका रूग्णालय, खाजगी हॉस्पिटल्स यांच्यासोबतच अनेक ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर्स उभारण्यात आली आहेत. हजारोंच्या संख्येत असलेली रूग्णसंख्या पाहता महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणा तोकडी पडत होती. अशावेळेस 25 मे दिवशी महाराष्ट्राच्या DMER कडून केरळकडून डॉक्टर, नर्सची मदत मिळावी असं पत्र पाठवण्यात आलं होतं. त्याला सकारातमक प्रतिसाद देत आता केरळकडून खास मेडिकल टीम महाराष्ट्राच्या मदतीला सज्ज आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारा चर्चा देखील केली होती.
मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 39 हजार 464 वर पोहचली आहे. यापैंकी 1 हजार 279 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.