IPL Auction 2025 Live

महाराष्ट्रात सद्य स्थितीत Coronavirus बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी, आजचे ताजे अपडेट एका क्लिकवर

यामध्ये सोमवारी 522 नवीन कोरोना (COVID-19) विषाणू पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत

Plasma Donation| Image Used For Representational Purpose Only| Photo Credits: IANS

भारतात (India) कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) 21 दिवसांचा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला. त्यामुळे ही परिस्थिती काही अंशा आटोक्यात आली. मात्र अपेक्षित परिणाम मिळाले नसल्याने 3 मे पर्यंतचा लॉकडाऊन देखील वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. देशात सर्वाधित कोरोना बाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात सद्य स्थितीत एकूण 8590 कोरोना बाधित रुग्ण आहेत. यामध्ये सोमवारी 522 नवीन कोरोना (COVID-19) विषाणू पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत व राज्यात 27 मृत्यूची नोंद झाली आहे. तर एकूण 94 रुग्णांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. आजच्या आकड्यांसह एकूण मृतांचा आकडा 369 झाला आहे.

तर दुसरीकडे राज्यात सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण असलेल्या मुंबई आणि ठाण्यात रुग्णांचा एकूण आकडा हा 6735 वर पोहोचला आहे. तर 238 रुग्ण दगावले आहेत.

Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात आज 522 नवीन कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 8590 वर

पाहूयात राज्यातील जिल्हानिहाय COVID-19 रुग्णांची आकडेवारी:

कोविड-१९ महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती(*अद्ययावत आकडेवारी दि. 27 एप्रिल 2020, सायं 6.00 नुसार)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 5776 219
2 ठाणे 40 2
3 ठाणे मनपा 295 4
4 नवी मुंबई मनपा 135 3
5 कल्याण डोंबिवली मनपा 145 3
6 उल्हासनगर मनपा 2 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 14 0
8 मीरा भाईंदर 121 2
9 पालघर 25 1
10 वसई विरार मनपा 121 3
11 रायगड 18 0
12 पनवेल मनपा 43 1
ठाणे मंडळ एकूण 6735 238
1 नाशिक 4 0
2 नाशिक मनपा 19 0
3 मालेगाव मनपा 123 12
4 अहमदनगर 26 2
5 अहमदनगर मनपा 16 0
6 धुळे 8 2
7 धुळे मनपा 17 1
8 जळगाव 18 4
9 जळगाव मनपा 2 1
10 नंदुरबार 11 1
नाशिक मंडळ एकूण 244 23
1 पुणे 58 3
2 पुणे मनपा 969 74
3 पिंप्री-चिंचवड मनपा 72 3
4 सोलापूर 6 0
5 सोलापूर मनपा 59 5
6 सातारा 29 2
पुणे मंडळ एकुण 1193 87
1 कोल्हापूर 7 0
2 कोल्हापूर मनपा 4 0
3 सांगली 26 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 1 1
5 सिंधुदुर्ग 1 0
6 रत्नागिरी 8 1
कोल्हापूर मंडळ एकुण 47 2
1 औरंगाबाद 1 0
2 औरंगाबाद मनपा 51 6
3 जालना 2 0
4 हिंगोली 8 0
5 परभणी 0 0
6 परभणी मनपा 1 0
औरंगाबाद मंडळ एकूण 63 6
1 लातूर 10 1
2 लातूर मनपा 0 0
3 उस्मानाबाद 3 0
4 बीड 1 0
5 नांदेड 0 0
6 नांदेड मनपा 3 0
लातूर मंडळ एकूण 17 1
1 अकोला 11 1
2 अकोला मनपा 18 0
3 अमरावती 1 0
4 अमवरावती मनपा 21 7
5 यवतमाळ 62 0
6 बुलढाणा 21 1
7 वाशीम 1 0
अकोला मंडळ एकूण 135 9
1 नागपूर 4 0
2 नागपूर मनपा 123 1
3 वर्धा 0 0
4 भंडारा 1 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 0 0
7 चंद्रपूर मनपा 2 0
8 गडचिरोली 0 0
नागपूर मंडळ एकूण 131 1
1 इतर राज्य 25 2
एकूण 8590 369

भारताबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासांत 1463 नवीन प्रकरणे आणि 60 मृत्यूची नोंद झाली. भारतामध्ये चोवीस तासांतील हा मृतांचा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. भारतातील एकूण कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 28,380 झाली आहे.