Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या हा एक चिंतेचा विषय आहे. ही संख्या मोठ्या प्रमाणावर नियंत्रित स्वरुपात वाढत आहे. मात्र, त्यातील वाढ कायम आहे. त्यामुळे राज्य सरकार अधिक काळजी घेत आहे. त्यात मुंबई आणि पुणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या काहीशी अधिक आहे. त्या तुलनेत राज्यातील उर्वरतीत भागात (मुंबई, पुणे जिल्हे वगळून) काहीसे दिलासादायक चित्र आहे. त्यामुळे इथले जनव्यवहार सुरु करण्यात यावेत अशी काही मंडळींची मागणी आहे. या मागणीत किती तथ्य हे आपल्याला महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी पाहिल्यावर ध्यानात येऊ शकेल. जाणून घ्या महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी.

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची इथे दिलेली आकडेवारी ही 24 एप्रिल 2020 या दिवशी सायंकाळी 6 वाजता अद्ययावत करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्रालय प्रत्येक दिवसाची कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी आणि तपशील हा त्या त्या दिवशी सायंकाळी 6 किंवा त्याच दिवशी रात्री उशीरा अद्यावत करत असते. त्यानुसार प्राप्त झालेली अधिकृत आकडेवारी खालील तक्त्यात दिली आहे. (हेही वाचा, Coronavirus Lockdown: देशातील नोंदणीकृत दुकाने काही अटींवर सुरु करण्यास गृह मंत्रालयाची परवानगी; 50 टक्केच कर्मचारी करू शकणार काम)

कोविड-19 महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती

(*अद्ययावत आकडेवारी दि. 23 एप्रिल 2020, सायं 6.00 नुसार)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 4447 178
2 ठाणे 35 2
3 ठाणे मनपा 220 4
4 नवी मुंबई मनपा 125 4
5 कल्याण डोंबिवली मनपा 131 3
6 उल्हासनगर मनपा 2 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 12 0
8 मीरा भाईंदर 118 2
9 पालघर 21 1
10 वसई विरार मनपा 114 3
11 रायगड 14 0
12 पनवेल मनपा 40 1
  ठाणे मंडळ एकूण 5279 198
1 नाशिक 4 0
2 नाशिक मनपा 7 0
3 मालेगाव मनपा 116 11
4 अहमदनगर 25 2
5 अहमदनगर मनपा 8 0
6 धुळे 6 1
7 धुळे मनपा 16 1
8 जळगाव 6 1
9 जळगाव मनपा 2 1
10 नंदुरबार 7 1
  नाशिक मंडळ एकूण 197 18
1 पुणे 43 2
2 पुणे मनपा 848 63
3 पिंप्री-चिंचवड मनपा 70 2
4 सोलापूर 1 0
5 सोलापूर मनपा 38 3
6 सातारा 20 2
  पुणे मंडळ एकुण 1020 72
1 कोल्हापूर 7 0
2 कोल्हापूर मनपा 3 0
3 सांगली 25 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 1 1
5 सिंधुदुर्ग 1 0
6 रत्नागिरी 8 1
  कोल्हापूर मंडळ एकुण 45 2
1 औरंगाबाद 0 0
2 औरंगाबाद मनपा 42 5
3 जालना 2 0
4 हिंगोली 7 0
5 परभणी 0 0
6 परभणी मनपा 1 0
  औरंगाबाद मंडळ एकूण 52 5
1 लातूर 9 0
2 लातूर मनपा 0 0
3 उस्मानाबाद 3 0
5 बीड 1 0
6 नांदेड 0 0
7 नांदेड मनपा 1 0
  लातूर मंडळ एकूण 14 0
1 अकोला 11 1
2 अकोला मनपा 12 0
3 अमरावती 0 0
4 अमवरावती मनपा 13 1
5 यवतमाळ 23 0
6 बुलढाणा 21 1
7 वाशीम 1 0
  अकोला मंडळ एकूण 81 3
1 नागपूर 2 0
2 नागपूर मनपा 99 1
3 वर्धा 0 0
4 भंडारा 0 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 0 0
7 चंद्रपूर मनपा 2 0
8 गडचिरोली 0 0
  नागपूर मंडळ एकूण 104 1
  एकूण 6817 301

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर असलेला लॉकडाऊन कालावधी येत्या 3 मे रोजी संपत आहे. दरम्यानच्या काळात देशातील दुकाने सुरु ठेवण्यास केंद्र सरकारने सशर्थ मान्यता दिली आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार आजपासून (25 एप्रिल) अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंची दुकाने सुरु करण्यासही केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. हा आदेश महापालिकांमधील बाजार संकुलातील दुकानांना लागू आहे. मात्र, मॉल आणि कोरोना हॉटस्पॉट्स किंवा कंटेनमेंट झोन असलेल्या ठिकाणी मात्र हा आदेश लागू असणार नाही. इथली दुकाने सुरु राहणार नाहीत.