SCC Viral Time Table: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वेळापत्रकामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ; अनेक विद्यार्थ्यांचा बुडाला हिंदीचा पेपर
परंतु, पेपर 8 मार्चलाचं होऊन गेल्याने विद्यार्थ्यांना मोठा झटका बसला. 8 मार्चला पेपर न दिल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची हिंदीच्या पेपरला अनुपस्थिती लागली.
SCC Viral Time Table: सध्या सोशल मीडियावर दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक (SSC Exam Time Table) व्हायरल होत आहे. या वेळापत्रकामुळे अनेक विद्यार्थ्यांचा हिंदी विषयाचा पेपर बुडाला आहे. बोर्डाच्या (SSC Board) वेळापत्रकात 8 मार्चला हिंदीचा पेपर दाखवण्यात आला होता. तसेच व्हायरल वेळापत्रकात 9 मार्चला हिंदीचा पेपर दाखवण्यात आला. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. परिणामी अनेक विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर बुडाला.
8 मार्च रोजी दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिंदी द्वितीय भाषा विषयाचा पेपर होता. हॉल तिकीटावर देखील 8 मार्च रोजी हिंदी द्वितीय भाषा विषयाचा पेपर असल्याचं बोर्डाकडून नमूद करण्यात आलं होतं. असं असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवला. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर बुडाला. (हेही वाचा -Maharashtra Board HSC Math's Question Paper Leak: बारावी गणित पेपरफुटीप्रकरणाचा तपास ‘SIT’ कडे)
अनेक विद्यार्थी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वेळापत्रकावर विश्वास ठेवून 9 मार्चला पेपरला गेले. परंतु, पेपर 8 मार्चलाचं होऊन गेल्याने विद्यार्थ्यांना मोठा झटका बसला. 8 मार्चला पेपर न दिल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची हिंदीच्या पेपरला अनुपस्थिती लागली. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या सर्व प्रकारामुळे बोर्डाकडून विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. व्हायरल झालेल्या कुठल्याही वेळापत्रकावर विश्वास ठेवू नका. तसेच हॉल तिकीटावर छापील वेळापत्रकावरच विश्वास विद्यार्थ्यांनी ठेवा, अशा सूचना बोर्डाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.
तथापी, व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा पेपर बुडाला आहे, अशा विद्यार्थ्यांसमोर आता जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षा देणं हा एकमेव पर्याय असणार आहे. विद्यार्थ्यांनी या प्रकाराचा कोणताही तणाव न घेता पुढील पेपरला सामोरं जावं, असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.