Mumbai Wall Collapsed: चर्नी रोडी येथील म्हाडाच्या इमारतीची कंपाउंड भिंत कोसळली, दोन मजूरांचा मृत्यू

ही घटना सोमवारी दुपारच्या दरम्यान घडली.या घटनेत दुर्दैवाने दोन मजुरांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला.

Photo Credit- X

Mumbai Wall Collapsed: मुंबईतील चर्नी रोड पूर्व येथील फणसवाडी भागातील म्हाडाच्या इमारतीची कंपाउंड भिंत कोसळली. ही घटना सोमवारी दुपारच्या दरम्यान घडली.या घटनेत दुर्दैवाने दोन मजुरांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.या घटनेची नोंद बीएमसी अधिकाऱ्यांनी घेतली आहे. (हेही वाचा- त्याच ठिकाणी पुन्हा नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित करू'; मालवणच्या राजकोट किल्ल्यावर घडलेल्या घटनेवर CM Eknath Shinde यांचे स्पष्टीकरण)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी खासजी कंत्राटदाराने गल्ली साफ करण्यासाठी तीन मजूर ठेवले होते. गल्ल्या साफ करत असताना अचानक एक कंपाऊंड भिंत दोघांच्या अंगावर कोसळली. त्यात ते ढिगाऱ्याखाली अडकले होते. घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापनांना देण्यात आली. बचाव कार्य सुरु झाल्यानंतर दोघांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.

बीएससीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या फणसवाडीतील दादीशेठ अग्यारी लेनवरील गांधी इमारतीपासून सुमारे ५-७ फूट उंच आणि ३० फूट लांबीची कंपाउंड भिंत कोसळली. ही घटना दुपारी २,३० च्या आसपास घडली.  घटनेनंतर परिसरात गोंधळ परिस्थिती निर्माण झाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेपूर्वी तीन मजूर गल्ली साफ करत होते. निषाद (३०) , रामचंद्र सहानी (३०) अशी मृतांची नावे आहेत. सनी कनोजिया १९ यांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले.