Coldplay Mumbai: जगप्रसिद्ध कोल्डप्ले मुंबईत, कार्यक्रम तारीख, तिकीट दर आणि ठिकाण घ्या जाणून

तिकिटांची विक्री 22 सप्टेंबर रोजी BookMyShow द्वारे होणार आहे.

Coldplay Mumbai Concert | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Coldplay Ticket Prices Mumbai: जानेवारी 2025 मध्ये मुंबईत एक मोठा संगीत कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. ज्याचे आयोजन मुंबई येथील डीवाय पाटील स्टेडियमवर करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जगप्रसिद्ध ब्रिटीश बँड कोल्डप्ले (Coldplay,British Rock Band) 18 आणि 19 जानेवारी 2025 रोजी (Coldplay India Tour Dates) आपले सादरीकरण करेल. हा कार्यक्रम या बँडच्या 'म्युझिक ऑफ द स्फीयर्स वर्ल्ड टूर' (Music of the Spheres World Tour) चा एक भाग आहे. सन 2016 मध्ये मुंबईत झालेल्या ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल नंतर जवळपास आठ वर्षांच्या काळानंतर कोल्डप्ले भारत दौऱ्यावर (Coldplay India) परतला आहे. या कार्यक्रमाची तिकीट विक्रीही सुरु होत असल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जाणून घ्या कोल्डप्लेच्या मुंबई येथील कार्यक्रमाबाबतचा तपशील.

कोल्डप्ले कार्यक्रम तिकीट बुकींग आणि रक्कम

प्राप्त माहितीनुसार, या कार्यक्रमाची तिकीट विक्री 22 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता बुकमायशो द्वारे सुरू होणार आहे. ज्याची किंमत 2,500 रुपयांपासून सुरू होते, ज्यामध्ये प्रत्येक व्यवहारासाठी जास्तीत जास्त आठ तिकिटांची मर्यादा असेल. म्हणजेच एक व्यक्ती जास्तीत जास्त 8 तिकीटेच खरेदी करु शकेल. आयोजकांनी स्पष्ट केले आहे की, कोल्डप्ले कार्यक्रमाची तिकिटे केवळ ऑनलाइन उपलब्ध असतील, या ठिकाणी बॉक्स ऑफिस विक्री होणार नाही.  (हेही वाचा, कॉमेडियन Trevor Noah याचा बंगळुरु येथील कार्यक्रम रद्द; चाहत्यांचा संताप, आयोजकांवर टिका)

सेटलिस्ट हायलाइट्स आणि विशेष अतिथी

कोल्डप्ले, त्यांच्या आकर्षक लाइव्ह परफॉर्मन्ससाठी ओळखले जाते. त्यांच्या सर्वात मोठ्या हिट्सची लाइनअप दर्शविणारा चार तासांचा शो वितरीत करेल. चाहत्यांना 'विवा ला विदा', 'ए स्काय फुल ऑफ स्टार्स', 'पॅराडाइज', 'माय युनिव्हर्स' आणि 'इन माय प्लेस' सारख्या क्लासिक्स ऐकायला मिळणे अपेक्षीत आहे. जे फ्रंटमन क्रिस मार्टिन, गिटार वादक जॉनी बकलँड, बास वादक गाय बेरीमन आणि ड्रमर विल चॅम्पियन यांनी थेट सादर केले आहेत. (हेही वाचा, Comedian Trevor Noah भारत दौऱ्यावर, कार्यक्रमाबद्दल घ्या जाणून)

दरम्यान, कोल्डप्लेच्या कार्क्रमाबाबत आगोदरच उत्सुकता असताना प्रेक्षकांना आणखी एक बोनस भेट मिळण्याची शक्यता आहे. सांगितले जात आहे की, याच कार्यक्रमात अथिती कलाकारही स्टेजवर सादरीकरण करणार आहे. या कलाकाराचे नाव अद्याप उघड झाले नसले तरी, चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दमदार मैफिलीचा अनुभव

कोल्डप्ले कॉन्सर्ट्स त्यांच्या थेट प्रक्षेपण आणि आश्चर्यकारक कामगिरीसाठी प्रसिद्ध आहेत. या कार्यक्रमाचा भाग म्हणून, उपस्थितांना एलईडी कलाईचे पट्टे मिळतील जे संगीतासह समक्रमित होतील. संपूर्ण स्टेडियममध्ये एक चित्तथरारक प्रकाश शो तयार करतील. या बँडने मुंबईतील चाहत्यांसाठी एक संस्मरणीय अनुभव देण्याचे आश्वासन दिले आहे. 2025 च्या सर्वात अपेक्षित कार्यक्रमांपैकी एक म्हणून या कार्यक्रमास ओळखळे जात आहे.

जागतिक दौऱ्याची तारीख

कोल्डप्लेच्या अधिकृत Instagram खात्याने अबू धाबी, हाँगकाँग आणि सोलमधील कामगिरीसह मुंबई शोची पुष्टी केली आहे. मुंबईत जाण्यापूर्वी या बँडचा जानेवारीमध्ये अबू धाबीमध्ये दौरा होणार आहे:

दरम्यान, कोल्डप्ले हा एक ब्रिटिश ॲलटर्नेटिव रॉक बँड आहे. ज्याची स्थापना गायक क्रिस मार्टिन आणि गिटार वादक जॉनी बकलँड यांनी 1996 मध्ये लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये केली. जो आज जगभरात प्रसिद्ध आहे. केवळ प्रसिद्धच नव्हे तर त्यांचे चाहतेही प्रत्येक देशात लाखोंच्या घरात आहेत.