जागतिक व्याघ्र दिन 2020 निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वनसंपत्ती संरक्षणाचा खास संदेश! (Watch Video)
वाघांच्या संरक्षणासाठी हा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाघ संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संदेश नागरिकांसह शेअर केला आहे.
आज 29 जुलै म्हणजेच जागतिक वाघ्र दिन (International Tiger Day). वाघांच्या संरक्षणासाठी हा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वाघ संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संदेश नागरिकांसह शेअर केला आहे. ज्या वनामध्ये वाघ संचार करतो, ते वन पर्यावरणीय दृष्टीने समृद्ध असते, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी वनसंपत्ती संरक्षणाचा खास संदेश दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या संदेशाचा व्हिडिओ मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. (International Tiger Day 2020: जागतिक व्याघ्र दिन निमित्त जाणून घ्या 'वाघ' बद्दल काही खास गोष्टी)
"महाराष्ट्रात बरीचशी वनसंपत्ती आणि संपूर्ण जंगलं अस्तित्वात आहेत. त्यामुळे वाघ्रदिनाचं महत्त्व आणि गोडवा केवळ एका दिवसापूरता मर्यादित न ठेवता आपण सर्वजण खांद्याला खांदा लावून हातात हात घालून वाघासह वनसंपत्तीचे संरक्षण करु शकलो तर आपली वनसंपत्ती, निसर्गसंपत्ती अधिक संपन्न होईल. त्यामुळे आपलं आयुष्य सुद्धा सुखा-समाधानाचं आणि समृद्ध होईल," असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना वाघ्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
CMO Maharashtra Tweet:
2010 साली सेंट पीटर्सबर्ग टाइगर समीट (Saint Petersburg Tiger Summit) मध्ये वाघ्रदिन साजरी करण्याची संकल्पना पुढे आली. वाघ्रदिन साजरी करण्याची सुरुवात रशिया मधून झाली आहे. दरम्यान 2019 पर्यंत देशात वाघांची संख्या 2967 इतकी होती, अशी माहिती भारत सरकारकडून देण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात 300 च्या आसपास वाघ आहेत.