CM Uddhav Thackeray Live Updates: मुंबई कार शेड, कृषी कायदा ते कोविड 19 ची परिस्थिती बद्दल पहा काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

ही मुंबईकरांसाठी मोठी बातमी दिली आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज (11 ऑक्टोबर) दिवशी पुन्हा राज्यातील जनतेशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी  राज्यातील कोरोना परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला आहे. सध्या मिशन बिगीन अंतर्गत राज्यात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आली आहे. पण त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढू नये म्हणून काळजी घेतली जात आहे.  दरम्यान मेट्रो 3 आणि मेट्रो 6 साठी आता आरे ऐवजी आता कांजूर मध्ये कारशेड होणार आहे. ही मुंबईकरांसाठी मोठी बातमी दिली आहे. यावेळेस त्यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या उपक्रमांची दखल घेत  आरोग्य कर्मचार्‍यांचे धन्यवाद मानले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या काही गोष्टींबाबत हलगर्जीपणा करण्याबाबतही बोट ठेवून खबरदारी घेण्याचं पुन्हा आवाहन केले आहे. Mumbai Metro Car Shed: मुंबई मेट्रो साठी Aarey Colony ऐवजी कांजूर मार्ग मध्ये नवं कारशेड.

दरम्यान आता सणासुदीचा काळ आहे. लोकांची वर्दळ आहे पण यामध्ये नागरिकांमध्येही शिथिलता आली आहे. परंतून असं वागणं टाळा. युरोपीय देशांप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन हवा आहे का? असा सवाल विचारत त्यांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. सोबतच लोकल, जीम, मंदिरं हळूहळूच सुरू होतील असे संकेत दिले आहेत. एकदम गर्दी टाळण्याला त्यांनी पसंती दर्शवली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या लाईव्ह मधील महत्त्वाचे मुद्दे

 

महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या 15,17,434 झाली असून काल पहिल्यांदाच नव्या रूग्णांच्या दुप्पटीने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या होती. काल 11,416 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 26 440 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 12,55,779 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2,21,156 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.76% झाले आहे.