CM Uddhav Thackeray Live Update: कोविड-19 चे दोन्ही लस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची 15 ऑगस्ट पासून परवानगी- उद्धव ठाकरे
त्यामुळे सर्वांचे लक्ष आता त्यांच्या भाषणाकडे लागून राहिले आहे. अशातच आता त्यांनी सुरुवातीला त्यांनी देशात नीरज चोप्रा याने ऑल्पिंकमध्ये सुवर्णपदक मिळवल्याने त्याचे अभिनंदन केले आहे.
CM Uddhav Thackeray Live Update: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज 8 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता त्यांच्या भाषणाकडे लागून राहिले आहे. अशातच आता त्यांनी सुरुवातीला त्यांनी देशात नीरज चोप्रा याने ऑल्पिंकमध्ये सुवर्णपदक मिळवल्याने त्याचे अभिनंदन केले आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. तर गेल्या एका वर्षात वाटले होते की कोविड19 ची स्थिती कमी होईल. पण कोरोनाच्या लाटा एकापाठोपाठ येत आहेत. त्यामुळे नियमांबद्दल सविस्तर माहिती देणारच आहे असे उद्धव ठाकरे यांनी असे म्हटले.
राज्याला गेल्या आणि यंदाच्या वर्षी सुद्धा महापुराचा फटका बसला. एकूणच राज्यातील पुराची स्थिती पाहता या काळात प्रशासनाने केलेल्या कामाचे उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. जवळजवळ साडेचार लाख नागरिकांना या परिस्थितीवेळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. नैसर्गिक आपत्तीचा सामना कसा करणार या बद्दल कायमस्वरुपात विचार केला जाणार असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यावरुन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी विधान केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, आरक्षण देण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. त्याचसोबत आरक्षणाचा अधिकार राज्याला द्यावा अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाल्याचे ही त्यांनी लाईव्हच्या वेळी म्हटले आहे.
अद्याप ही कोविडची परिस्थिती कायम आहे. गेल्या वर्षीचे आणि यंदाचे सण पाहता कोरोनाचे नियम पाळायचे आहेत. तसेच लसीकरणाचा ठराविक टप्पा पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी नियमांचे पालन करावे लागणार आहेतच. आरोग्य सुविधेवर ही अधिक भर दिला जात आहे. राज्यात सध्या 600 पेक्षा अधिक टेस्टिंग लॅब असल्याचे सांगण्यात आले आहे. जिनोम सिक्वेंन्सिंग लॅब महापालिकेने सुरु केली आहे. येथे कोरोनाच्या विविध वेरियंटबद्दल चाचणी केली जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पुरग्रस्त भागात पाण्याच्या अनुशंगाने रोगराई येऊ शकते आणि कोरोनाची स्थिती पाहता तेथे सुद्धा अधिक काळजी घेत आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा कोल्हापूर या भागात कोरोना संदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच उद्यापासून काही ठिकाणी निर्बंध थिशिल केले जात आहेत. उद्योजक आणि ऑफिसेस यांनी कार्यालयाच्या वेळा बदला असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्याचसोबत गर्दी टाळणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे. रेस्टॉरंट, मॉल्स, प्रार्थनास्थळ याबद्दलचा निर्णय पुढील 8-10 दिवसात घेतला जाईल. या संदर्भात उद्या टास्क फोर्स सोबत बैठक घेतली जाणार असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबईतील लोकल प्रवास येत्या 15 ऑगस्ट पासून मुंबईकरांसाठी सुरु होणार आहे. मात्र पहिल्या टप्प्यात लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना मुभा असणार आहे. लोकलबद्दलच्या प्रवासाठी एका अॅपवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर नागरिकांना एक पास दिला जाणार आहे. त्याचसोबत त्यांच्याकडे फोन नाही त्यांना पास घेण्यासाठी महापालिकेच्या विभागात ते उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. तर सणासुदीचे दिवस ही सुरु होणार असल्याने नियमांचे पालन करणे ही अत्यावश्यक आहे.