Ram Navami 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह 'या' नेत्यांनी दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी राम नवमी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आज चैत्र महिन्यातील शुल्क नवमी. आजच्या दिवशी प्रभु रामाचा जन्म झाला. त्यामुळे ही राम नवमी (Ram Navami). आजचा दिवस भारतभर अगदी उत्साहात साजरा केला जातो. राम नवमी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil), एनसीपी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विटच्या माध्यमातून राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, "प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांच्या आयुष्यात आरोग्यदायी आणि सुखी, संपन्न श्रीराम प्रहर कायम रहावा, अशी प्रभू चरणी प्रार्थना करूया... जय श्री राम!"
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे:
उपमुख्यमंत्री अजित पवार:
आरोग्यमंत्री राजेश टोपे:
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील:
एनसीपी अध्यक्ष शरद पवार:
(हे ही वाचा: Ram Navami 2021: राम नवमी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा!)
रामनवमी निमित्त सर्व नेत्यांनी प्रभू रामाला वंदन करत सध्या देशासह राज्यावर घोंघावत असलेल्या कोविड-19 संकटावर मात करण्याची सदिच्छा व्यक्त केली आहे.