Online Classes In Maharashtra: महाराष्ट्रात ऑनलाईन माध्यमातून शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मान्यता

कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात शाळा, महाविद्यालय, उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या होत्या. मात्र, राज्यात 3 जूनपासून अनेक गोष्टींना शिथिलता मिळण्यास सुरुवात झाली आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात शाळा, महाविद्यालय, उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या होत्या. मात्र, राज्यात 3 जूनपासून अनेक गोष्टींना शिथिलता मिळण्यास सुरुवात झाली आहे. नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिक्षण विभागासोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ऑनलाईन, डिजीटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शाळा सुरु (Online Classes In Maharashtra) करण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही त्या ठिकाणी पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा उघडता येतील, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या देखील या बैठकीत उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीत या बैठकीत शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्षाला सुरुवात होती की नाही? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकालाही पडला होता. यातच उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. या बैठकीत ऑनलाईन माध्यमातून शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. ज्यामुळे पालक वर्गाला पडलेला प्रश्नाला पूर्णविराम लागला आहे. रेड झोनमध्ये नसलेल्या इयत्ता नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग येत्या जुले महिन्यांपासून सुरु होणार आहे. तसेच सहावी, सातवीचे वर्ग ऑगस्टपासून तर, तिसरी ते पाचवीचे वर्ग सप्टेंबर महिन्यांपासून सुरु होतील. इयत्ता पहिली आणि दुसरी शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, इयत्ता अकरावीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे. हे देखील वाचा- Maharashtra SSC, HSC Result 2020: 10,12वी च्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच जाहीर होणार निकालाची तारीख

ट्वीट-

महत्वाचे म्हणजे, ज्या ठिकाणी कोरोनाचा अधिक पार्दुभाव आहे, तिथे शाळा सुरु होणार नाही. अशा परिसरात टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. काही कंपन्यांनी इतर राज्यांत प्रयोग केले आहेत त्याचीही परिणामकारकता तपासावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement