CM Eknath Shinde On Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या 'सावरकर विरोधी' वक्तव्याचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धिक्कार; राज्यात निघणार 'सावरकर गौरव यात्रा'

आता ही हिंमत उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या बाबतीत दाखवणार का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

CM-DyCM On Savarkar | Twitter

कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्याबाबत झालेल्या विधानावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपली भूमिका मांडली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आज एकनाथ शिंदेंनी आपण सावरकरांबाबत आणि परदेशात जाऊन भारताची निंदा करणार्‍या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा धिक्कार करतो असं म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी राज्यात आता 'सावरकर गौरव यात्रा'(Savarkar Gaurav Yatra) काढल्या जातील अशी देखील घोषणा केली आहे.

दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावरही निशाणा साधला आहे. ठाकरे गटाची भूमिका ही दुटप्पीपणाची असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मालेगावच्या सभेत बोलताना काल उद्धव ठाकरे यांनी आपण राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा धिक्कार करत असल्याचं सुनवलं आहे. पण नेमकं यामधून ठाकरे गट काय करणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

मणिशंकर अय्यर यांचा निषेध करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या पुतळ्याला चप्पल मारली होती. आता ही हिंमत उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या बाबतीत दाखवणार का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. सावरकर हा विचार केवळ त्यांच्या भाषणापुरता आहे तो कृतीत उतरत नाही असे ही ते म्हणाले आहेत. नक्की वाचा: Uddhav Thackeray Warns Rahul Gandhi: 'वीर सावरकर आमचे दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही'; उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा.

सावरकर गौरव यात्रा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ आणि राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी भाजपा- शिवसेना यांच्याकडून एकत्र सावरकर गौरव यात्रा काढली जाईल असं आज जाहीर करण्यात आलं आहे. ही यात्रा राज्यात प्रत्येक जिल्ह्यात, गावात, विधानसभा क्षेत्रातून निघणार असल्याची माहिती दिली आहे. सध्या जनतेमध्ये सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत असंतोष असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे.

इथे पहा संपूर्ण प्रतिक्रिया

आपण 'गांधी आहोत सावरकर नाही' या वकतव्यावरही बोलताना त्यांनी 'सावरकर असण्याइतकी तुमची क्षमता नाही. एक दिवस सेल्युलर जेल मध्ये राहुल दाखवा' असं आव्हानही शिंदेंनी राहुल गांधी यांना दिलं आहे.



संबंधित बातम्या

Cash For Votes Allegations: पैसे वाटपाच्या आरोपांनंतर विनोद तावडेंची कायदेशीर कारवाई; मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींसह 'या' काँग्रेस नेत्यांना पाठवली नोटीस

Maharashtra Election Result 2024: महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये नेमकं कोण? पहा शिवसेना, भाजपा, एनसीपी, उबाठा(शिवसेना), एसपी (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आणि कॉंग्रेसने किती जागा लढवल्या?

Maharashtra New Chief Minister: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? महायुती आणि महाविकासआघाडी यांच्यात जोरदार दावेदारी; जाणून घ्या प्रमुख चेहरे

Amit Thackeray-Sada Sarvankar at Siddhi Vinayak: सदा सरवणकर-अमित ठाकरे सिद्धिविनायक मंदिरात आले समोरासमोर; 'उलटा धनुष्यबाण' बघून अमित ठाकरे यांनी केलेल्या कृतीची चर्चा (Watch Video)