IPL Auction 2025 Live

Sangli Flood: सांगली येथील ब्रम्हनाळ दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं असताना स्थानिक बोट उलडल्याची दुर्दैवी घटना सांगलीतील ब्रम्हनाळ येथे घडली.

Sangli Flood | (Archived, Edited, Representative Images)

तुफान पावसामुळे कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं असताना स्थानिक बोट उलटल्याची दुर्दैवी घटना सांगलीतील ब्रम्हनाळ येथे घडली. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी नेत असताना ही  बोट उलटून 16 जण बुडाले असून त्यापैकी 9 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. यात 3 मुलं, 5 महिला आणि 8 पुरूष असल्याची माहिती असल्याची माहिती समोर येत आहे. (Sangli Flood: सांगली मधील ब्रम्हनाळ गावात पूरग्रस्तांना मदतीदरम्यान अपघात; बोट उलटल्याने 16 जण बुडाल्याची भीती)

गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा आढवा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर, सातारा, सांगली दौरा करणार आहेत. याच दरम्यान त्यांनी सांगलीतील ब्रम्हनाळ दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

तसंच सांगलीत निर्माण झालेली पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आलमट्टी धरणात पाच लाख क्यूसेक्स पाणी सोडायला कर्नाटक सरकार तयार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

CMO Maharashtra Tweet:

तसंच राज्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

CMO Maharashtra Tweet:

त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर येथील पूरपरिस्थितीचा आढावा घेत पूरग्रस्तांची विचारपूस करत शेतीची नुकसानभरपाई देण्याचा दिलासा देण्यात आला आहे.