IPL Auction 2025 Live

देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा बंगला ‘डिफॉल्टर’ यादीत, BMC कडे साडेसात लाखांचं पाणी बिल थकलं

यासोबतच अन्य 18 मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांची देखील या यादीत नोंद घेण्यात आलाय आहे.

CM Varsha Bunglow In BMC Defaulter List (Photo Credits: File Image)

नियमांच्या समोर सगळे सारखेच! याचा दाखला देत बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची डिफॉल्टर यादीत नोंद घेतली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)  सध्या राहत असलेल्या वर्षा बंगल्याचे (Varsha Bunglow) तब्बल साडेसात लाखाहून जास्त पाणी बिल थकले होते. त्यामुळे आता हे पाऊल उचलण्यात आले आहे. विशेष म्हणजे या यादीत फक्त मुख्यमंत्रीच नाही तर इतर 18 मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांचा सुद्धा समावेश आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेकडून पाणी बिल थकबाकीदारांची माहिती मिळवली होती.ज्या मध्ये या मंत्र्यांच्या शासकीय घरांचे 8 कोटी हून अधिक पाणी बिल शिल्लक असल्याचे समजत आहे.

ANI ट्विट

लोकसत्ताच्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं 7 लाख 44 हजार 981 रुपये पाणी बिल थकलं आहे. तर इतर नेत्यांच्या पाणी बिलाची रक्कम एकत्र केली तर ती 8 कोटी इतकी आहे. पण इतक्या मोठ्या रक्कमेच्या थकबाकीवर अजूनही पालिकेने कायदेशीर कारवाई केलेली नाही. डिफाल्टर यादीत असलेल्या काही मंत्र्यांची नावे आणि थकीत रक्कम किती आहे ते जाणून घेऊयात..  मुंंबई: नाल्यांंमध्ये कचरा टाकणार्‍यांना होणार पोलिस आणि दंडात्मक कारवाई; BMC चा नवा प्लॅन

आता ही राजकीय मंत्री मंडळी पालिकेच्या कारवाई आधी पाण्याचे बिल भरतात की त्या आधी पालिका पाण्याचा पुरवठा बंद करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.