Weather Update: ढगाळ वातावरणामुळे राज्यातील थंडी गायब पण नवीन वर्षात कडाका वाढण्याची शक्यता

वरुण राज्याचं दर्शन होत नाहीये तर ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली आहे. तरी पुढील दोन ते तीन दिवस या प्रकारचं ढगाळ वातावरण असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Nashik Winter | PC: unsplash.com

देशभरात थंडीने गारठला आहे. विविध राज्यात हुडहुडी भरली असुन रोज निच्चांकी तापमानेच्या वेगवेगळ्या नोंदी पुढे येत आहे. उत्तर भारतात तर थंडीची लाट पसरली आहे असं म्हण्टल तरी हरकत नाही. नाताळात अचानक महाराष्ट्रातही थंडी वाढली आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र  या भागात कडाक्याची थंडी पडताना दिसत आहे. पण काल पासून मात्र राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण असल्याचं बघायला मिळत आहे. वरुण राज्याचं दर्शन होत नाहीये तर ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली आहे. तरी पुढील दोन ते तीन दिवस या प्रकारचं ढगाळ वातावरण असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तरी मुंबई, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागत ढगाळ वातावरण असणार आहे. मुंबईत तर थंडी कमी काय पण घामाच्या धारा लागण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.

 

किंबहुना मुंबईतील दक्षिण मुंबई भागात सर्वात कमी तापमानाची नोंद गेल्या तीन दिवसात होत आहे. तर त्याच बरोबर पश्चिम मुंबई, मध्य मुंबईसह मुंबई उपनगर ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या भागात कडाक्याची थंडी जाणवत आहे. तरी मुंबईसह उपनगरात सकाळी आणि संध्याकाळी कमाल तापमानाची नोंद होत आहे. पण आता ख्रिसमस नंतर मुंबईतून थंडी पुन्हा गायब होणार असुन उद्यापासून मुंबईत उकाडा जाणवणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (हे ही वाचा:- Pune Water Cut Update: पुण्यात 29 डिसेंबर दिवशी पाणी पुरवठा राहणार बंद)

 

उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा 12 ते 20 अंशांच्या दरम्यान कायम होता. दिवसा उन्हाचा चटका कायम आहे. विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी 33.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सातत्याने 30 अंशांच्या पार आहे. राज्याच्या किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.