Malegaon Violence: नांदेड आणि मालेगावमध्ये बंद दरम्यान चकमक, हिंसाचारात 7 पोलीस कर्मचारी जखमी
हिंसाचारानंतर बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी लोकांना घरातच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आज नांदेड (Nanded)आणि मालेगावमध्ये (Malegaon) हाणामारीची घटना घडली आहे. या घटनेत अतिरिक्त एसपीसह 7 पोलीस जखमी झाले आहेत. बातमीनुसार, एकाच समाजातील दोन गट एकमेकांना भिडले. त्यानंतर हिंसाचार आणि दगडफेक झाली. त्रिपुरातील हिंसाचाराच्या (Violence) विरोधात यापूर्वी मालेगावमध्ये एका विशिष्ट समुदायाकडून निदर्शने करण्यात आली होती आणि त्यादरम्यान लोक एकमेकांशी भिडले होते. हिंसाचारानंतर बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी लोकांना घरातच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज झालेल्या हिंसक चकमकीनंतर नाशिकचे एसपी सचिन पाटील म्हणाले की, मालेगावमध्ये सध्या शांतता आहे. त्यांनी सांगितले की, संध्याकाळी काही लोकांनी 3-4 दुकानांवर दगडफेक केली. हेही वाचा Pune Crime: पुण्यातील खडकीमध्ये लष्करी कर्मचाऱ्याच्या घरात चोरी, चांदीच्या भांड्यांसह दारुच्या बाटल्यांवर चोरांनी मारला डल्ला
याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत. यासोबतच त्यांनी लोकांना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती पसरवू नये असे आवाहन केले आहे. असे करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल. आज झालेल्या हिंसक चकमकी दरम्यान पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यासोबतच अमरावती येथे निदर्शना दरम्यान 20 हून अधिक दुकानांची तोडफोड करण्यात आली.
अब्दुल हमीद चौकात विशिष्ट समाजाचे हजारो लोक रस्त्यावर आले. दोन गटात हाणामारी झाल्यानंतर हाणामारी झाली. यापूर्वी त्रिपुरातील हिंसाचाराच्या विरोधात मालेगावमध्ये निदर्शने झाल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान लोकांमध्ये हाणामारी झाली. या वर्षी बांगलादेशात दुर्गापूजे दरम्यान अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरुद्ध हिंसाचाराच्या अलीकडील अहवालानंतर, त्रिपुरामध्ये जाळपोळ, लूटमार आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान या प्रकरणी त्रिपुरातील हिंसाचाराच्या विरोधात आज राज्यभरातील मुस्लिमांनी निषेध मोर्चा काढला होता. यादरम्यान नांदेड, मालेगाव, अमरावती आणि अन्य काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. मी सर्व हिंदू आणि मुस्लिमांना शांतता राखण्याचे आवाहन करतो, असे महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलांनी आवाहन केले आहे.