Child-Lifting Rumours in Thane: मूल चोरण्याच्या संशयावरून 30 वर्षीय व्यक्तीला दिवा मध्ये जमावाकडून बेदम मारहाण
पोलिसांकडून राज्यात अनेक ठिकाणी बाळचोरीच्या खोट्या अफवा, वायरल व्हॉट्सअॅप मेसेज वर विश्वास न ठेवण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले आहे.
ठाणे (Thane) जिल्ह्यातील दिवा (Diva) भागामध्ये एका 30 वर्षीय व्यक्तीला लोकांच्या जमावाने मुल चोरण्याच्या उद्देशाने आल्याच्या संशयाने बेदम मारहाण केली आहे. ही घटना काल 29 सप्टेंबर दिवशी दुपारी घडली आहे. यामध्ये पीडीत पिंटू निसार ला मारहाण झाली आहे. त्याला पोलिसांनी स्थानिक रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्याला काही जखमा झाल्या असून त्यासाठी उपचार सुरू आहेत.
निसार हा एका हॉटेल मध्ये काम करतो. मुंब्रा पोलिस स्टेशन कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तो रस्त्याच्या कडेला उभा होता तेभा एक भरधाव ट्रक त्याच्या जवळून जात असताना त्याला थोडा धक्का लागला. तो थोडा मागे सरकताच त्याच्या मागील मुलगी पडली. तिला सावरण्याचा प्रयत्न करताना तिच्या आईने पाहताच तो बाल चोर असल्याचं सांगून आरडाओरड सुरू केली.
काही वेळातच त्याच्या भोवती लोकं जमली. त्यांनी त्याला मारहाण सुरू केली. हाताला मिळेल त्या वस्तूने त्याला बदडलं. यामध्ये लाकडी, लोखंडी रॉडचा देखील समावेश होता. यावेळी निसारने तो बाळ चोरी करणारा नसल्याची सतत विनवणी करत होता. पण त्याला जमावाने मारणं बंद न केल्याचं तो सांगतो. हे देखील नक्की वाचा: Sadhus Beaten Up in Sangli: साधूंना बेदम मारहाण, मुलं चोरणारी टोळी समजून कृत्य; सांगली येथील घटना .
मुंब्रा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. त्याला जमावाच्या मारहाणीतून सोडवलं. या मारहाणीत त्याला अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. त्याची अवस्था पाहून त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
सिनियर इन्सपेक्टर Ashok Kadlag यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये जे सहभागी आहेत त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई केली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही. पोलिसांकडून राज्यात अनेक ठिकाणी बाळचोरीच्या खोट्या अफवा, वायरल व्हॉट्सअॅप मेसेज वर विश्वास न ठेवण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले आहे.