Nilesh Rane On Uddhav Thackeray: 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले' बीड घटनेनंतर भाजप नेते निलेश राणे यांची टीका
बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा केज रस्त्यावर येलंबघाट येथे ही घटना घडली. या पीडितेचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातआहे.
बीडमध्ये (Beed) प्रेयसीवर अॅसिड हल्ला करुन नंतर पेट्रोल टाकून पेटवून देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा केज रस्त्यावर येलंबघाट येथे ही घटना घडली. या पीडितेचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातआहे. याप्रकरणी भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राज्य सरकारला जबाबदार ठरवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. बीड घटनेनंतर राज्यातील महिला असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत, असे निलेश राणे म्हणाले आहेत.
बीडमध्ये एका 22 वर्षीय तरुणीला ऍसिड टाकून ठार मारण्यात आले. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत, अशा आशयाचे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे. हे देखील वाचा- Beed Women Ablaze: बीड येथील पीडित तरुणीच्या मृत्युनंतर देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, बाळा नांदगावकर यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया
निलेश राणे यांचे ट्वीट-
नेमके प्रकरण काय आहे?
बीड तालुक्यातील येळंबघाट येथे शनिवारी रस्त्यालगत 22 वर्षीय तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. शेळगाव ( ता.देगलूर जि. नांदेड ) येथील तरुणी गावातीलच एका तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. हे दोघेही दि.13 नोव्हेंबर रोजी रात्री पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास येळंबघाट परिसरात निर्मनुष्य ठिकाणी तरुणाने दुचाकी थांबवली. तरुणीला रस्त्याच्या कडेला घेऊन तिच्यावर तरुणाने अॅसिड टाकले. त्यांनतर काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याचा प्रकार घडला आहे. ज्यामुळे पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अविनाश राजुरे असे त्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला होता. अखेर आरोपी नांदेड पोलिसांच्या हाती लागला असून त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.