Chhatrapati Sambhaji On Governor: राज्यपालांच्या वक्तव्याशी राज्यकर्ते सहमत? सवाल उपस्थित करत छत्रपती संभाजी राजेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात कुठलही कारवाई करण्यात आली नाही म्हणजे राज्यकर्ते राज्यपालांच्या महाराजांबद्दलच्या त्या वक्तव्यास सहमत आहेत का असा सवाल विचारत छत्रपती संभाजी राजे आक्रमक झाले आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या (Governor Bhagat Singh Koshyari) वक्तव्यानं राज्यात नव्या वादाला वाचा फोडली आहे. राज्यपाल विरुध्द विरोधीपक्ष असा सामना रंगला असताना राज्य सरकारने कुठलीही कारवाई न केल्याने शिंदे फडणवीस सरकारकडून (Shinde Fadnavis Government) ताशेरे ओढले जात आहे. तरी आता या वादावर छत्रपती संभाजींचा राजें देखील आक्रमक झाल्याचं चित्र आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य करुन जवळपास एक आठवडा व्हायला आला. राज्यभरातून तीव्र प्रतिक्रीया उमटल्या पण अजूनही राज्यपालां विरोधात कुठलही ठोस पाऊस उचलण्यात आलं नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या विरोधात कुठलही कारवाई करण्यात आली नाही म्हणजे राज्यकर्ते राज्यपालांच्या महाराजांबद्दलच्या त्या वक्तव्यास सहमत आहेत का असा सवाल विचारत छत्रपती संभाजी राजे आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान केला. त्यानंतर एका खासगी न्यूज चॅनच्या चॅट शोमध्ये भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी देखील शिवाजी महाराजांबाबत चुकीचे वक्तव्य केले. यावरुन राज्यातील राजकारण (Maharashtra Politics) चांगलचं तापल होत पण आता पुन्हा एकदा कर्नाटक (Karnataka) महाराष्ट्राच्या (Maharashtra) सिमावादाचा प्रश्न पुढे आल्याने राज्यपालांच्या वक्तव्यावर पडदा पडला तरी राज्य सरकरार (Maharashtra Government) यांवर काय भुमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. (हे ही वाचा:- Raj Thackeray: आज मुंबईत ‘राज’गर्जना, नेस्को ग्राउंडवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा)
राष्ट्रवादीचे सर्वोसर्वे शरद पवार (Sharad Pawar), विरोधक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), खासदार संजय राऊत (Sanjay Raut), आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या त्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तरी त्यानंतर अजून तरी राज्यपालांविरोधात कुठलही महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं नाही. पुढे यांवर नेमकी काय कारवाई होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.