Chandrapur Shocker: काकांच्या अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Drowning प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Chandrapur Shocker: वर्धा नदीत बुडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्यांपैकी एक जण चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि भाजप नेते गोविंदा पोडे यांचा समावेश आहे. रविवारी ही घटना घडली. बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथे ही दुर्घटना घडली. घरातीला नातेवाईकाच्या अस्थी विसर्जनासाठी तिघे जण गेले होते. दरम्यान त्यांच्यावर काळाने घात केला. तिघांचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे गावात मोठी शांतता पसरली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोविंगा पोडे हे त्यांच्या काकांच्या अस्थी विसर्जनासाठी वर्धा इरई नदीच्या काठावर गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत इतर कुटुंब सदस्य देखील होते. यावेळी नदीत अस्थी विसर्जनासाठी त्यांच्या मुलगा चेतन पोडे आणि भाचा गणेश उपरे उतरले. थोड्याच वेळाने ते पाण्यात बुडू लागल्याने गोंविदा पोडे यांनी नदीत उडी घेतली. दरम्यान तिघांचाही बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती बचाव कार्यांला देण्यात आली. घटना स्थळी बचाव पथचाचे काम सुरु झाले. शोध घेताच त्यांना चेतन पोडे याचा मृतदेह सापडला परंतु इतर दोन मृतदेहांचा शोध सुरु आहे.या घटनेची माहिती गावात कळताच गावात शोककळा पसरली.