Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

मात्र, राज्याच्या उर्वरित भागात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे.

Maharashtra Weather Forecast (फोटो सौजन्य - फेसबुक)

Maharashtra Weather Forecast: सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये दिवसभर ऊन आणि रात्रीच्या वेळेला पाऊस पडत असून हवामानाचे मिश्रण होत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील विविध भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. विशेषत: मुंबईसह कोकण प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्तता आहे. मात्र, राज्याच्या उर्वरित भागात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे.

सोमवारी, IMD ने मुंबईसाठी किमान तापमान 25.99 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवला असून दिवसभर हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कमाल तापमान 29.23 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - (हेही वाचा - Rain-Related Deaths in Marathwada: यंदा मराठवाड्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 64 जणांचा मृत्यू; विजेच्या धक्क्याने 38 लोकांनी गमावला जीव)

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, कोकण (पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग), मध्य महाराष्ट्र (नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर) यासह महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. तथापी, मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड) आणि विदर्भ (बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली) मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात गेल्या 24 तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय, मुंबई उपनगरात पुन्हा हलक्या पाऊस पडला.