Monsoon Update: ऑगस्ट महिन्यात राज्यात कमी पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

त्यानंतर दक्षिण कोकणात 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढू शकतो, असा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

Monsoon Update: चालू ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने(Maharashtra Weather Forecast) वर्तवली आहे. जुलैमध्ये पावसाने सरासरी गाठली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर मंदावला(Maharashtra Rain) आहे. राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण ओसरले आहे. कोकणातही काहीशी अशीच परिस्थीती आहे. मध्य महाराष्ट्रात पाऊस समाधानकारक असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.(हेही वाचा: Nashik Rain: नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात शिरलं पाणी; गंगापूरमधूनही विसर्ग वाढवला (Watch Video))

पुढील दोन दिवसांत उत्तर आणि दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. , अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जुलैमध्ये कोकणासह घाट माथ्यावर पावसाने चांगलाच जोर धरला होता. राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला होता. कोकणात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. पुण्यातही पूराने थैमान घातले होते. जुलैमध्ये झालेल्या दमदार पावसाने राज्यात सर्वांचीच तहान भागवली. पावसामुळे राज्यातील 90 टक्के धरणे तुडुंब भरली आहेत. (हेही वाचा: Pune Rain: पुण्यात खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग सुरू, या भागातील वीजपुरवठाही केला खंडीत)

मात्र, ऑगस्टमध्ये पाऊस दडी मारण्याची शक्यता आहे. पावासचा जोर काहीसा कमी असणार आहे. चिंतेची बाब अशी की सप्टेंबरमध्येही अशीच स्थिती असणार आहे. त्यानंर पावसाळा संपण्याच्या मार्गावर असतो. मागील आठवड्यात पावसाने लोणावळ्यात हाहाकार केला होता. अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचून अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी गेले होते. त्यामुळे लोणावळ्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र विकेंडला पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने पर्यटकांना पावसाची ही पर्वणी मिळणार आहे.