व्हॉट्सअॅप ग्रुपवर धमकी दिल्याने तरुणाची तलावरीने हत्या

औरंगाबाद येथील विरोधी पक्षाला व्हॉट्सअॅप ग्रुपवर धमकवल्याने 35 वर्षीय तरुणाची तलावारीने रविवारी रात्री हत्या करण्यात आली आहे.

प्रातिनिधीक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

औरंगाबाद येथील विरोधी पक्षाला व्हॉट्सअॅप ग्रुपवर धमकवल्याने 35 वर्षीय तरुणाची तलावारीने  रविवारी रात्री हत्या करण्यात आली आहे. तर पोलिसांनी दोन पक्षातील वैमनस्यामुळे ही घटना घडली असल्याचे सांगितले आहे.

मोईन पठाण असं या तरुणाचे नाव आहे. रविवारी रात्री मोईन याने आपल्या विरोधी पक्षाला धमकवणारी एक पोस्ट व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर पोस्ट केली होती. त्यामुळे विरोधी पक्षातील संतप्त झालेल्या 20 तरुणांनी मोईन पठाण राहत असलेल्या ठिकाणी पोहचले. तर मोईन पठाण  फातिमानगर येथे असल्याचे कळल्याने त्या 20 जणांनी रागाच्या भरात मोईनवर तलावारीने वार केले. मात्र तेथे उपस्थित असलेला मोईनचा भाचा त्याला वाचण्यासाठी गेला, परंतु त्याला सुद्धा या तरुणांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर तेथील स्थानिक लोकांनी या दोघांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मोईनला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. तर  हत्येतील अन्य आरोपींनी पळ काढला असून पोलिसांकडून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईस असं पोलिसांनी स्पष्ट सांगितले आहे.



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Maharashtra Assembly Elections 2024: निवडणूक काळात दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या प्रत्येक बातमीवर निवडणूक आयोग ठेवणार लक्ष; माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष कार्यरत

Amit Shah's Bag Check By EC: निवडणूक अधिकाऱ्यांकडून हिंगोलीत अमित शहा यांच्या बॅगची तपासणी, पहा व्हिडिओ

Consensual Sex With Minor Wife Is Rape: अल्पवयीन पत्नीसोबत संमतीने लैंगिक संबंध ठेवणे हाही बलात्कारच; Bombay High Court चा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रातील 12 लाखांहून अधिक कामगार विधानसभा मतदानापासून वंचित राहू शकतात; ऊस तोडणी संघटनेने व्यक्त केली चिंता