Mumbai Local Train: मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक संपणार; 'या' स्थानकांपर्यंतच धावणार लोकल ट्रेन
रेल्वे प्रशासनाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मात्र, जम्बोब्लॉक संपला तरीही लोकल ट्रेन काही स्थानकांपर्यंत मर्यादीत असणार आहे. त्याविषयी जाणून घेऊयात.
Mumbai Local Train: मुंबईत मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकामध्ये 24 डब्ब्यांच्या मेल एक्सप्रेससाठी फलाट क्रमांक 10-11 ची लांबी वाढवण्याचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले होते. त्याशिवाय, ठाणे स्थानकामध्ये फलाट क्रमांक 5 च्या रूंदीकरणाचे काम या ब्लॉक (Megablock) मध्ये केले जाणार होते. आज म्हणजे रविवारी दुपारी 3 वाजता हा ब्लॉक संपणार आहे. अत्यावश्यक पायाभूत सुविधांसाठी ठाण्यात 63 तासांचा आणि सीएसएमटी येथे 36 तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. ब्लॉकदरम्यान अनेक लोकल ट्रेन (Mumbai Local Train) रद्द करणयात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. मेगा ब्लॉक संपला तरीही लोकल ट्रेन 'काही' स्थानकांपर्यंत धावणार आहे. (हेही वाचा:Central Railway's 63-hour Mega Block Update: मध्य रेल्वे कडून आज मध्यरात्रीपासून फलाट रूंदीकरणाचं काम हाती; ठाणे स्थानकात 63 तर सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा ब्लॉक!)
दरम्यान, भायखळा आणि वडाळा स्टेशनपर्यंतच लोकल धावणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. सीएसएमटी येथील 36 तासांचा ब्लॉक दुपारी 12.30 पर्यंत संपणार आहे. तर ठाणे येथील 63 तासांचा ब्लॉक आज दुपारी 3.30 पर्यंत संपणार आहे. मात्र, सीएसएमटीच्या ब्लॉकमुळे आजही लोकल भायखळा, परळ, दादर आणि वडाळ्यापर्यंत धावणार आहेत.
मध्ये रेल्वेच्या या लोकल वेळापत्रकामुळे रविवारी मुंबईकरांचे हाल होण्याची दाट शक्यता आहे. रविवारी लोकल ट्रेनच्या 235 फेऱ्या आणि 270 लोकल अंशत: रद्द असतील, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडणे योग्य ठरेल.