Deccan Queen: डेक्कन रेल्वेच्या डायनिंग कारच्या जागी येणार प्रवासी कोच?
प्रवाशांच्या सोयीसाठी डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार काढून तेथे प्रवासी कोच जोडण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन(Central Railway) करत आहे.
देशातील पहिली आयएसओ (IS0) प्रमाणित रेल्वे म्हणून जिच्या उल्लेख केला जातो, त्या डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार(Deccan Queen Dinning Car) बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाढत्या प्रवासी संख्येमुळे डेक्कन क्वीनची डायनिंग कार च्या तेथे प्रवासी कोच लावण्याचा मध्य रेल्वे प्रशासन करत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. येत्या काही दिवसात याबाबतीत ठोस निर्णय घेण्यात येईल.
आरामदायी सेवा देणारी सेवा देणारी डेक्कन क्वीन (Deccan Queen) आपल्या डायनिंग कारमुळे ही तितकीच लोकप्रिय आहे. त्यामुळे अनेक प्रवासी ह्या डायनिंग कारचा अनुभव घेण्यासाठी डेक्कन क्वीनने प्रवास करतात. मात्र गेल्या काही वर्षात पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार काढून तेथे प्रवासी कोच जोडण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन(Central Railway) करत आहे.
डेक्कन क्वीन मधील डायनिंग कार काढून टाकण्याचा प्रस्तावर जरी आला असला, तरी ह्याबाबत सविस्तर चर्चा करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. सध्याच्या डायनिंग कारमध्ये ३२ प्रवाशांना आरामदायी कुशन असलेली आसनव्यवस्था देण्यात येतेय. या डायनिंग कारमधील मसाला ऑम्लेट, शुद्ध शाकाहारी कटलेट, मिसळ पाव, बटाटा वडा, थालीपीठ, कांदा भजी, साबुदाणा खिचडी हे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या डायनिंग कारसोबत लाखो रेल्वे प्रवाशांच्या भावना जोडलेल्या असल्यामुळे नक्कीच सर्व बाजूंनी याचा विचार केला जाईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येतय.
डेक्कन क्विन एक्स्प्रेस होणार अधिक सुसाट; मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ 30-35 मिनिटांनी कमी होणार
ह्याआधीही अनेकदा रेल्वे प्रशासनाकडून डायनिंग कार काढण्याचा विचार करण्यात आला होता, मात्र प्रवाशांमधील त्याच्या लोकप्रियेमुळे तो लांबणीवर गेला. एक डायनिंग कार काढून गर्दीचा प्रश्न सुटणार नसून, डेक्कन क्वीनच्या कोचचीच संख्या वाढवावी. अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे.