मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता लोकलमध्ये मिळणार Free Wi-Fi

दररोज रेल्वेतून प्रवास होत असल्याने रेल्वेत, स्थानकात मिळणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असते.

Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुंबई लोकल ही मुबंईकरांची लाईफलाईन आहे. दररोज रेल्वेतून प्रवास होत असल्याने रेल्वेत, स्थानकात प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असते. इंटरनेट, वाय फायची वाढती गरज, क्रेझ लक्षात घेता मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रेल्वे स्थानकांप्रमाणे लोकलमध्येही फ्री वाय फायची सुविधा मिळणार आहे. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अनिल कुमार जैन यांनी सांगितले की, "लोकल डब्यात हॉटस्पॉटचे ट्रायल चालू आहे. जुलै 2019 पर्यंत मध्य रेल्वेच्या सर्व लोकल्समध्ये ही सुविधा सुरु करण्यात येईल." (मुंबई: 'पश्चिम रेल्वे'ची अप-डाऊन मार्गावरील वाहतूक कोलमडली; वसई रोड रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड)

सुविधेचा लाभ घेण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी लागेल

हॉटस्पॉटच्या माध्यमातून प्रीलोडेड कन्टेंट पाहण्यासाठी प्रवाशांना सर्वप्रथम एक अॅप डाऊनलोड करावे लागेल. अॅप डाऊनलोड झाल्यानंतर तुमच्या पसंतीच्या भाषेची निवड करा. त्यानंतर तुम्ही अगदी सहज स्मार्टफोनवर मुव्ही किंवा व्हिडिओजचा आनंद घेऊ शकता. मात्र या मोबाईल अॅपचे काम सुरु आहे. हे पूर्ण होण्यासाठी सुमारे 4 महिन्यांचा कालावधी लागेल. रेल्वे स्थानकांवर खुल्या पद्धतीने लिंबू सरबत विकण्यास बंदी, मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय

रेल्वेलाही फायदा

आपला फायदा वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. प्रवाशांनी हॉटस्पॉट वापरल्याने जाहीरातीद्वारे रेल्वेला रेव्हेन्यू मिळेल. रेल्वे बोर्डाने देखील सर्व रेल्वे मार्गांना रेव्हेन्यू वाढीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी फक्त भारतीय रेल्वेच्या लग्झरी ट्रेन्समध्ये प्रीलोडेड कन्टेंट पाहायला मिळत होता. आता ही सुविधा लोकल ट्रेनमध्ये ही उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांचा प्रवासही मनोरंजक व्हायला मदत होईल. मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन्समध्ये फ्री वाय फायची सेवा सुरु करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.

फ्री वाय फायची सेवा देणाऱ्या स्टेशन्समध्ये वाढ

यापूर्वी रेल्वे प्रशासनातर्फे केवळ 832 रेल्वे स्टेशन्सवर फ्री वाय फायची सुविधा मिळत होती. आता ही संख्या वाढवत 6,441 रेल्वे स्टेशन्सवर फ्री वाय फायची सेवा देण्यात येणार आहे.