मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने लॉन्च केले रोबोटिक डिव्हाईस 'Captain Arjun'; कोविड-19 च्या काळात थर्मल स्क्रिनिंगसह मिळणार 'या' सुविधा (Watch Video)

पुणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्याचे थर्मल स्क्रिनिंग करतानाचा व्हिडिओ मध्य रेल्वेने शेअर केला आहे.

‘Captain Arjun' Robotic Device (Photo Credits: Twitter)

देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा 3 लाखांच्या वर गेला असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. दरम्यान देशात लॉकडाऊनचा (Lockdown) पाचवा टप्पा सुरु असून अनलॉक 1 (Unlock 1) च्या माध्यमातून टप्पाटप्प्याने जनजीवन पुन्हा सुरु होत आहे. जनजीवन सुरु होत असले तरी गर्दी  करणे टाळायचे आहे. रेल्वे स्टेशनवर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या (Central Railway) पुणे विभागाने (Pune Division) रोबोटीक डिव्हाईज (Robotic Device) कॅप्टन अर्जुन (Captain Arjun) लॉन्च केले आहे. प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी हे डिव्हाईज तयार केले असून यात अॅडव्हाईन्स फिचर्स देण्यात आले आहेत. पुणे रेल्वे स्टेशनवर (Pune Railway Station) कर्मचाऱ्याचे थर्मल स्क्रिनिंग (Thermal Screening) करतानाचा व्हिडिओ मध्य रेल्वेने शेअर केला आहे.

कॅप्टन अर्जुन या अनोख्या डिव्हाईजमुळे मोठ्या प्रमाणावर असलेल्या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी लागणारा वेळ, श्रम वाचण्यास मदत होईल. तसंच यात सेन्सर बेस्ड सॅनिटायझर (Sensor-Based Sanitiser), मास्क डिस्पेन्सर (Mask Dispenser), फ्लोअर सॅनिटायझर (Floor Sanitiser) या सुविधाही देण्यात आल्या आहेत. रेल्वेसेवा अद्याप सुरु झाली नसली तरी लवकरच ती सुरु करण्यात येईल, अशी आशा आहे. रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या विचार करुन हे डिव्हाईज लॉन्च करण्यात आले आहे. (कोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन)

Central Railway Tweet:

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 1 लाखाच्या पार गेली असून 3 हजार हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मुंबई, पुणे शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबई शहरात 55451 कोरोनाग्रस्त रुग्ण असून पुण्यात हा आकडा 11281 इतका आहे. दरम्यान लॉकडाऊन काळात रेल्वेसेवा बंद होती. केवळ अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठीच रेल्वे सुरु होत्या. या काळात रेल्वेने 17 लाख 81 हजार डब्बे धान्य, मीठ, साखर, दूध, खाद्यतेल, कांदा, फळे इत्यादी गोष्टी देशभरात पुरवण्यात आल्या आहेत.