Mumbai AC Local Update: मध्य रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार वातानुकूलित, सीएसएमटी ते कल्याण दरम्यान उद्यापासून धावणार 10 एसी लोकल्स

मध्य रेल्वेने (Central Railway) सीएसएमटी ते कल्याण (CSMT-Kalyan) मार्गावरील प्रवाशांचा प्रवास वातानुकूलित होणार असून उद्यापासून या मार्गावर 10 एसी लोकल धावणार आहेत.

Mumbai AC Local (Photo Credit: PTI)

पश्चिम रेल्वे मार्गावर (Western Railway) वातानुकूलित रेल्वे (AC Local) दाखल झाल्यानंतर मध्य रेल्वेकडे या वातानुकूलित रेल्वे कधी सुरु होणार याची मध्य रेल्वेचे प्रवासी वाट पाहत होते. मात्र त्यांची ही प्रतिक्षा आता संपुष्टात आली आहे. मध्य रेल्वेने (Central Railway) सीएसएमटी ते कल्याण (CSMT-Kalyan) दरम्यान एसी लोकल रेल्वेला हिरवा कंदिला दाखवला असून आता या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास वातानुकूलित होणार आहे. उद्यापासून या मार्गावर 10 एसी लोकल्स धावणार आहेत. 25 डिसेंबर 2017 मध्ये मुंबईत पहिली एसी लोकल सुरु झाली होती. ही लोकल पश्चिम रेल्वेवर सुरु करण्यात आली होती. त्यानंतर ट्रान्सहार्बर देखील एसी लोकल सेवा सुरु झाली.

जानेवारी 2020 मध्ये ठाणे ते पनवेल एसी लोकल सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र एसी लोकलला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद न मिळत असल्याने मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ही सेवा सुरु करण्यात आली नव्हती. मात्र आता मुख्य मार्गावर सीएसएमटी-कल्याण दरम्यान ही लोकल सेवा सुरु करण्यास मध्य रेल्वेने सुरु केली आहे. हेदेखील वाचा- यावर्षी Christmas आणि New Year साजरा करता येणार नाही? लवकरच मुंबई महापालिका जाहीर करणार नवी नियमावली

ANI Tweet:

यामध्ये मध्य रेल्वे मार्गावर सकाळी वातानुकूलित एसी लोकलच्या दोन फे-या आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी इतर फे-या सोडण्यात याव्या यावर विचार सुरु आहे, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. तसेच हार्बर मार्गावरही लवकर ही वातानुकूलित एसी लोकल सेवा सुरु व्हावी याबाबत विचार केला जात आहे.

येत्या 1 जानेवारी 2021 पासून मुंबई लोकल सेवा (Mumbai Local Service) सर्वसामान्यांसाठी नियमितपणे सुरु होईल असे संकेत मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिले आहेत.

मध्यंतरी ट्विटरवर एका युजरने विजय वडेट्टीवार यांना टॅग करत मुंबई लोकल सेवा कधी सुरु होतील याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी लवकरच रेल्वे सेवा सुरु करू असे सांगितले होते. मात्र त्यानंतर परिस्थितीत काही विशेष बदल झालेला दिसला नाही. मात्र आता दिलेल्या नव्या माहितीनुसार, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लोकल रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरु करणार असल्याचे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत