Palghar Accident: कारची तीन दुचाकींना धडक, व्यवसायिकेला अटक, पालघर येथील घटना
या घटनेत तीन तरुण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पालघर पोलिसांनी किचनवेअर कंपनीनेच संचालक प्रियेश परमार यांना अटक करण्यात आला आहे. परमार हे पालघर येथील उद्योग नगर येथील त्यांच्या कार्यलयातून परतत असताना रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
Palghar Accident: पालघर - मनोर रस्त्यावर २ ऑक्टोबर रोजी भीषण अपघात (Accident) झाला. या घटनेत तीन तरुण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पालघर पोलिसांनी किचनवेअर कंपनीनेच संचालक प्रियेश परमार यांना अटक करण्यात आला आहे. परमार हे पालघर येथील उद्योग नगर येथील त्यांच्या कार्यलयातून परतत असताना रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. (हेही वाचा- शहरात आणखी एक Hit And Run प्रकरण, कारची दुचाकीला धडक; खासदाराचा मुलगा गणेश हंडोरे याला अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, परमार यांनी बेदरकारपणे वाहन चालवून, तीन दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, तीन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी कार चालक पळत होता, स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली आणि काही स्थानिकांनी पाठलाग करून त्याला मनोर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल केले.
या अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यावरून जात असलेल्या तीन दुचाकीला कारने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरून जाणारे तरुण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर अधिकाऱ्यांना कळले की हा परमारचा पहिला गुन्हा नाही. यापूर्वी देखील अपघातात एक सहभागी झाले.