Mumbai Drugs Case: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने नवाब मलिकांचा जावई समीर खानसह अन्य दोघांचे आवाजाचे नमुने मागवले

तसेच केंद्रीय एजन्सीने स्थापन केलेल्या एसआयटीकडे सोपवले आहे. मलिक यांनी एनसीबी अधिकारी आणि क्रूझ शिप ड्रग छापा प्रकरणातील पंच साक्षीदार यांच्यावर केलेल्या आरोपांच्या तपासाचा एक भाग म्हणून ही कारवाई सुरु केली आहे.

NCB Office (Photo Credits-ANI)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने नुकताच मुंबईतील विशेष NDPS कोर्टात एक अर्ज दाखल केला आहे. ज्यामध्ये NCP मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान आणि इतर दोघांच्या ड्रग्ज प्रकरणात आवाजाचे नमुने मागवले आहेत. बुधवारी  एनसीबी एसआयटीने (SIT) आपली चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात समीर खानसह अटक करण्यात आलेला यूके नागरिक करण सजनानीचा जबाब नोंदवला.  सजनानी आणि खान यांची सप्टेंबरमध्ये जामिनावर सुटका करण्यात आली होती.  एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी खान विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करताना मलिक यांनी अनियमितता आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता.

समीर खान प्रकरण हे वानखेडेंकडून काढून घेतलेल्या सहापैकी एक प्रकरण आहे. तसेच केंद्रीय एजन्सीने स्थापन केलेल्या एसआयटीकडे सोपवले आहे. मलिक यांनी एनसीबी अधिकारी आणि क्रूझ शिप ड्रग छापा प्रकरणातील पंच साक्षीदार यांच्यावर केलेल्या आरोपांच्या तपासाचा एक भाग म्हणून ही कारवाई सुरु केली आहे. हेही वाचा  Sanjay Raut On Tripura Violence: देशात हिंदूंना खरोखरच धोका असेल तर मोहन भागवतांनी दिल्लीत आंदोलन करावे, संजय राऊतांची प्रतिक्रिया

वानखेडे यांच्या पथकाने यापूर्वीच समीर खान प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे.  एजन्सीने खान आणि सजनानी यांच्या व्हॉईस चॅटचीही तपासणी केली असून फॉरेन्सिक टीमने त्यांच्या आवाजाचे नमुने तपासले आहेत. एनसीबीने आता पुढील तपासणीसाठी आवाजाचे नमुने आवश्यक असल्याचे सांगितले आहे.