Buldhana College Website Hacked: 'पाकिस्तान जिंदाबाद'चा संदेश; बुलढाणा येथील महाविद्यालयाची वेबसाईट हॅक
College Website Hacked: सायबर हॅकरनी आता आपले लक्ष शाळा महाविद्यालयांच्या संकेतस्थळांकडेही वळवल्याचे पुढे आले आहे. हॅकर्सनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर एज्युकेशन सोसायटी (Mehkar Education Society) द्वारा संचालित कला व वाणिज्य महाविद्यालयाचे (Arts and Commerce College Website) संकेतस्थळ हॅक केले आहे. महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा अचानक झळकू लागल्या. त्यानंतर एकच खळबळ उडाली. घडला प्रकार लक्षात येताच महाविद्यालय प्रशासनाने तातडीने संकेतस्थळ बंद केले. बुलढाणा जिल्हा पोलिसांनीही या घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केल्याचे समजते. हा प्रकार 15 जून रोजी घडल्याचे वृत्त आहे.
मे ए सो कला व वाणिज्य महाविद्यालय हे मेहकर एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेद्वारा चालवले जाते. महत्त्वाचे म्हणजे हे महाविद्यालय तालुक्यातील सर्वात जुणे आणि मोठे म्हणून ओळखले जाते. प्राप्त माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने महाविद्यालयाची वेबसाइट हॅक केली. त्यानंतर त्यावर 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा झळकावल्या. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या लाईव्ह वृत्तात म्हटले की, महाविद्यालयाची वेबसाईट हॅक झाल्याची तक्रार मेऐसो महाविद्यालयाचे प्राचार्य परिहार यांनी पोलिसांमध्ये दिली. त्यानंतर जिल्हा सायबर सेलकडून घटनेची नोंद घेऊन तपास सुरु करण्यात आला. (हेही वाचा, WhatsApp Edit Message: आता व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज एडीट करता येणार; नवीन फीचर जारी, जाणून घ्या सविस्तर)
अधिक माहिती अशी की, मेऐसो महाविद्यालयाचे प्राचार्य परिहार यांची तक्रार प्राप्त होताच मेहकर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधून संकेतस्थळ बंद केले.