Building Collapsed in Mumbai: वांद्रे येथी शास्त्रीनगर परिसरात G+2 इमारत कोसळली; 1 ठार

या तीन मजली इमारतीचा आधार काढल्याने काल रात्री ते कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याची माहिती घटनास्थळी असलेल्या डीसीपींनी दिली आहे.

Building Collapsed | PC: Twitter/ANI

वांद्रे (Bandra)  परिसरात बुधवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास एक दुमजली घर कोसळलं आहे. या दुर्घटनेमध्ये वांद्रे येथील शास्त्रीनगर परिसरामधील आहे. या दुर्घटनेमध्ये 1 जण ठार झाला असून अन्य 16 जखमींवर नजिकच्या रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सारे बिहार (Bihar) मधून आलेले मजूर होते. बीएमसी कडून सध्या बचाव कार्य सुरू आहे. फायर ब्रिगेड सध्या घटनास्थळी दाखल आहे. इमारत कोसळल्यानंतर  23 जणांची सुटका करण्यामध्ये प्रशासनाला यश आलं आहे.

दरम्यान मुंबई मध्ये काल रात्री पूर्व मोसमी पाऊस देखील बरसला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, तळमजला आणि वर दोन मजले अशा बांधकामातील ही इमारत होती. त्यामध्ये तळमजल्यावरील सारे सुखरूप आहेत. पहिल्या मजल्यावरील सहा तर दुसर्‍या मजल्यावरील 17 जणांना दुखापत झाली आहे. यामधील सार्‍यांना भाभा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

ANI Tweet

मालकाने 2 दिवसांपूर्वीच दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या बाजूचे घर तोडले होते. या तीन मजली इमारतीचा आधार काढल्याने काल रात्री ते कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याची माहिती घटनास्थळी असलेल्या डीसीपींनी दिली आहे.