IPL Auction 2025 Live

Union Budget 2020: दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे 2023 पर्यंत होणार सुरू; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा

2023 पर्यंत हा एक्सप्रेस वे प्रवाशांसाठी सादर करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

निर्मला सीतारमण । File Photo

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज (1 फेब्रुवारी) आगामी वर्षाचा अर्थसंकल्प (Union Budget) मांडला. सुमारे 2 तासाहून अधिक वेळ चाललेल्या अर्थसंकल्पीय भाषणाकडून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र आज फार मोठ्या घोषणा झालेल्या नाही. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे (Mumbai Delhi Express Way)  बाबत मात्र महत्त्वाची घोषणा केली आहे. 2023 पर्यंत हा एक्सप्रेस वे प्रवाशांसाठी सादर करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान आज अर्थसंकल्पामध्ये  1.7 लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. Union Budget 2020 Highlights: अर्थमंत्री निर्मला सीतारमण कडून अर्थसंकल्प जाहीर; जाणून घ्या अशा गोष्टी ज्यांचा तुमच्यावर होणार परिणाम.  

आज मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे आणि चैन्नई - बेंगलोर एक्सप्रेस वेचा समावेश आहे. हे प्रकल्प 2023 पर्यंत तयार होईल असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान आज निर्मला सीतारमण यांनी 2500 किमीचे एक्स्प्रेस वे, 9 हजार किमीचे इकॉनॉमिक कॉरिडोर आणि 2 हजार किमीचे स्टॅटेजिक हायवे यांचा समावेश आहे. हायवेचं काम 2024 पर्यंत पूर्ण होतील सोबतच 6 हजार किमीचे हायवे बनवण्यात येणार आहेत.

ANI Tweet

दरम्यान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रीक हायवेची घोषणा केली आहे. उर्जेवर हे ई हायवे चालणार आहेत. दरम्यान भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आता विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. देशात तेजस एक्सप्रेस वाढवून आता पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आता दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे हा देखील या त्याच प्रोजेक्टचा एक भाग आहे.