COVID19: रुग्णांकडून उपचारांसाठी अतिरिक्त पैसे आकरल्याप्रकरणी नानावटी रुग्णालयावर गुन्हा दाखल; मुंबई महानगरपालिकेची कारवाई

कोरोनावरील उपचार घेण्यासाठी रुग्णांकडून अतिरिक्त पैसे आकरल्याप्रकरणी नानावटी रुग्णालयाविरोधात (Nanavati Hospital) सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रातिनिधिक फोटो (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) धुमाकूळ घातले असताना सर्वांच्या भुवया उंचवणारी माहिती समोरी आली आहे. कोरोनावरील उपचार घेण्यासाठी रुग्णांकडून अतिरिक्त पैसे आकरल्याप्रकरणी नानावटी रुग्णालयाविरोधात (Nanavati Hospital) सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शासनाने आखून दिलेल्या नियमावलीला धुडकावून कोविड 19 रुग्णांवर उपचार करण्याकरिता जादा बिल घेतल्या संदर्भात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खाजगी रुग्णालयांच्या या लुटी विरोधात शासनाने वेळोवेळी नियमावलीही आखली आहे. मात्र, काही खाजगी रुग्णालय या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे समजत आहे. अशाच रुग्णालयाविरुद्ध आता मुंबई महानगरपालिकेने (BMC) आपली कारवाई कठोर केली आहे.

नानावटी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तसेच त्यांच्याकडून अतिरिक्त पैस घेतले जात आहेत. अशी माहिती मुंबई महानगरपालिका मिळाली होती. याप्रकरणाची दखल घेत मुंबई महानगरपालिकेच्या अधिकऱ्यांनी नानावटी रुग्णालयात पाहणी केली. दरम्यान, अधिकाऱ्यांनी कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात आलेली बिलांची तपासणी महापालिकेने आपल्या ऑडिटर मार्फत केली. त्यावेळी नानावटी रुग्णालय रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेने 1 जून रोजी सांताक्रुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हे देखील वाचा- COVID19 Cases In Dharavi: मुंबई येथील धारावी परिसरात एकूण 2 हजार 301 कोरोनाबाधित; दिवसभरात 19 नव्या रुग्णांची नोंद, तर 2व जणांचा मृत्यू

एएनआयचे ट्वीट-

कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, रुग्णालयातील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करत आहेत. ज्यामुळे संपूर्ण देशातून त्यांचे कौतूक केले जात आहे. मात्र, काही खाजगी रुग्णालयात रुग्णांची लूट होत असल्याचे पाहून लोकांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत.