Ratnagiri Rains: जगबुडी नदीवरील पुलाला मोठे भगदाड, मुंबईकडे होणाऱ्या वाहतूकीवर परिणाम

त्याच्या रस्ते कामाची पुन्हा पोलखोल आता पुन्हा झाली आहे. रविवारी मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे.त्यामुळे जगबुडी पुलावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे.

Photo Credit- X

Ratnagiri Rains: मुंबई – गोवा महामार्गावर प्रवास करताना नागरिकांना नेहमीच त्रास होतो. सुरु असलेल्या रस्ते कामाची पुन्हा पोलखोल झाली आहे. रविवारी मुंबई गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदीवरील(Jagbudi River) पुलाला मोठे भगदाड पडल्याचे समोर आले आहे. परिणामी खेड जगबुडी पुलावरची मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी थांबण्यात आली होती. दोन्ही बाजूकडील ही वाहतूक आता एकाच पुलावरून सुरु करण्यात आली आहे. (हेही वाचा:Ratnagiri Flood Situation: कोकणात मुसळधार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती )

खेड येथील जगबुडी नदीवरील पुलाला तडे जाऊन मोठे भगदाड पडल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. या पुलाची पहाणी केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सध्या, दुसऱ्या पुलावरून दोन्ही बाजूची वहातूक सुरु झाल्याने वाहतूक कोंडी संपली.

संततधार पावसामुळे रविवारी सकाळी मंडणगड शहरातील गांधी चौकातील पुलाजवळील भराव खचल्याने पुलावरून जाणारी वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली. दरम्यान तालुक्यात दोन दिवस संततधार बरसत असलेल्या पावसामुळे भारजा नदीला पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. जिल्ह्यात एक जुनपासून आतापर्यंत सरासरी दोन हजार आठपेक्षा जास्त मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात रविवारी दिवसभरात मंडणगड तालुक्यात 139.80 मिमी सरासरी जास्त तर चिपळूण तालुक्यात 76.70 मिमी सरासरी एवढ्या कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गतवर्षी 21 जुलैपर्यंत 1453.74 मिली एवढ्या सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

चिपळूण येथील वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीत वाढ होवू लागल्याने येथेही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजापुर बाजार परिसरात चारवेळा पाणी भरल्याने येथील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. तर लांजा येथे कोसळणाऱ्या पावसामुळे मुचकुंदी नदीला पूर आल्याने या पुराचे पाणी चांदेराईच्या बाजारपेठेत शिरले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif